Home मुंबई दीपिका पदूकोण-रणवीरचं वर्षअखेरीस लग्न?

दीपिका पदूकोण-रणवीरचं वर्षअखेरीस लग्न?

77

बॉलिवूड इंडस्ट्रीतलं मोस्ट फेव्हरिट कपल दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंह हे वर्षअखेरीस लग्न करू शकतात. दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबीयांमध्ये या दोघांच्या लग्नाची बोलणी झाली असून, या वर्षी सप्टेंबर-डिसेंबरदरम्यान ते विवाहबंधनात अडकतील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. दीपिका आणि रणवीर हे दोघेही त्यांच्या कुटुंबीयांसोबत गेल्या वर्षअखेरीस मालदीवला फिरायला गेले होते. तेथून परतल्यानंतर दीपिकाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दोघांनी साखरपुडा केल्याचं वृत्त पसरलं होतं. मात्र, नुकत्याच एका शोमध्ये दीपिकानं हे वृत्त फेटाळून लावलं. मात्र, आता पुन्हा या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. ते दोघे वर्षअखेरीपर्यंत लग्न करणार असल्याचं सांगण्यात येतं. मीडिया वृत्तानुसार, ते दोघेच नुकतेच सुट्टीहून परतले आहेत. या दोघांच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबीयांनी संमती दिली आहे. त्यांनी सप्टेंबर आणि डिसेंबरमधील चार तारखाही लग्नासाठी निवडल्या आहेत. दीपिका आणि रणवीर सध्या वेडिंग डेस्टिनेशनच्या शोधात आहेत. ते दोघे विदेशातही लग्न करू शकतात, असं काही वृत्तांत म्हटलं आहे. जवळची मित्रमंडळी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत ते लग्नगाठ बांधतील, असंही सांगितलं जातं.