Home latest News बाप हा बापच असतो, बापा ईतका श्रीमंत जगात दुसरा कोणच नसतो

बाप हा बापच असतो, बापा ईतका श्रीमंत जगात दुसरा कोणच नसतो

99

बाप हा बापच असतो, बापा ईतका श्रीमंत जगात दुसरा कोणच नसतो

बाप हा बापच असतो, बापा ईतका श्रीमंत जगात दुसरा कोणच नसतो

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048

बापाईतका श्रीमंत जगात
दुसरा कोणच नसतो
प्रत्येक बापाची लेक राजकुमारी
अन् ल्योक राजकुमार असतो.

लेकरांचे हट्ट पुरवण्यात
बापाचा खरा आनंद असतो
अवखळ हास्य नजरेत साठवण्याचा
वेड्या जीवाला छंद असतो.

कर्जाच्या ओझ्याचा बाजार
बाप कधीच करत नसतो.
काळजीच्या वणव्यात
एकटाच होरपळत असतो.

संकटांना दाराबाहेरच थोपवणारं
बाप एक ब्रम्हास्त्र असतं
अगदी फुलात असतो आपण
जोवर डोक्यावर बापाचं छत्र असतं

वरवरून कठोर भासणारा बाप ही
नाजूक,कोमल, हळवा असतो
लेक सासरी जाताना बाप
हंबरडा फोडून रडत असतो.

लेकरांची ससेहोलपट होताना
बाप त्राही त्राही होत असतो
दाटून आलेल्या उमाळ्यांना आवरून
पाठीशी उभं राहणारा बाप खंबीर खांब असतो.

झिजलेल्या टाचा,रुतलेला काटा
जीवघेण्या त्या वेदना मूकपणे सोसतो
फाटकेच धोतर अन् फाटकाच सदरा
तरी प्रत्येक बाप “राजा माणूस”असतो.

कवयित्री
संगीता सुरशेट्टे – नाचपल्ले
प्रा.शिक्षिका
रा.जि.प.शाळा चांदोरे, माणगाव – रायगड