चंद्रपुरातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 2 जानेवारी
नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी पेट्रोल डिझेल कंपनीचे ट्रकचालक संपावर गेले आहेत. इंधनाच्या गाड्या शहरात दाखल न होण्याच्या भीतीने पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या लागल्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र चंद्रपूर शहरातील सर्वच पेट्रोल
पंपांवर बघावयास मिळाले. नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप करत राज्यातील अनेक भागात वाहनचालकांनी आंदोलन केलं.








