Home latest News वाहतूक नियंत्रणासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशील कदम यांनी वाहतूक पोलीसांना केले सहकार्य

वाहतूक नियंत्रणासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशील कदम यांनी वाहतूक पोलीसांना केले सहकार्य

79

वाहतूक नियंत्रणासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशील कदम यांनी वाहतूक पोलीसांना केले सहकार्य

वाहतूक नियंत्रणासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशील कदम यांनी वाहतूक पोलीसांना केले सहकार्य

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-माणगांवमध्ये नेहमीच्या ट्रॅफिकला कंटालेल्या माणगांवकरासाठी एक वेगळा उपक्रम आदर्श म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुशील कदम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. गेल्या अकरा वर्षांपासून रखडलेल्या महामार्गाचे काम कासवागतीने चालू असून अजून कोकणकराना किती प्रतीक्षा करावी लागेल हे सरकार आणि स्थानिक पुढारीच जाणो माणगांव शहरातील राहदारी कमी करण्याची योजना मार्गी लावावी हिच अपेक्षा सुशील कदम यांनी आमच्या जवळ सांगितले.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार दि.1 जानेवारी रोजी माणगांव शहरात सामाजिक कार्याचा एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला आई कणकाई सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुशीलजी कदम व त्याच्या सहकारी यांनी माणगांव बाजारपेठ, मोर्बा रोड, निजामपूररोड यां ठिकाणी वाहतूक पोलीस यांच्या सोबत वाहतूककोडी सोडविण्यासाठी सहकार्य केले तसेच सामाजिक संस्था, मंडळ कार्यकर्ते यांनी वाहतूककोडीवर अभियंता तसेच सहकार्य राबविले तर माणगांव मध्ये वाहतूककोडीची सुटका होऊ शकते.