Home latest News विजय हजारे यांचे आमरण उपोषण; नेरळ येथील रा.जी.प. वाणिज्य संकुल व विश्राम...

विजय हजारे यांचे आमरण उपोषण; नेरळ येथील रा.जी.प. वाणिज्य संकुल व विश्राम गृह इमारती समोर

70

विजय हजारे यांचे आमरण उपोषण; नेरळ येथील रा.जी.प. वाणिज्य संकुल व विश्राम गृह इमारती समोर

विजय हजारे यांचे आमरण उपोषण; नेरळ येथील रा.जी.प. वाणिज्य संकुल व विश्राम गृह इमारती समोर
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

नेरळ:-विजय हजारे ग्रामपंचायत कोल्हारे येथे विद्यमान सदस्य असून नेहमीच अन्याय विरोधार आवाज उठवीत आले असल्याचे पाहायला मिळते. त्यांनी एकंदरीत ११ मागण्यान करिता दि २ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११.३० पासून आमरण उपोशणास बसले आहेत.
१) नेरळ ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेली राजीव वाणिज्य संकुल व विश्रामगृह इमारत खुली करण्यात यावी व इमारतीत बांधलेले गाळे वाटप करण्यात यावे. इमारतीचे उद्घाटन होऊन दीड वर्ष होऊन गेले तरी सुद्धा इमारतीमधील गाळे वाटप का करण्यात आले नाही.
२) कोलारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ कळम राज्यमार्ग नेरळ कशेळे राज्य मार्ग नेरळ साई मंदिर बोपले प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यालगत असलेले सर्व अनधिकृत बांधकाम काढून टाकणे.
३) कोलारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील धामोते बोपले परिसरातील सर्व अनधिकृत बांधकाम काढून टाकणे.
४) कोलारे चार फाटा ते नॅनो सिटी पर्यंत रस्ता करणे
५) कोलारे येथील प्रमुख रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे
६) कोलारे ब्रिज ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत रस्ता करणे
७) कोलारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते येथील आसरा आश्रम समोरील रस्ता करणे व गटार बांधकाम करणे
८) कोलारे ग्रामपंचायत हद्दीतील पेशवाई रोड द मॉर्निंग बिल्डिंग ते दामत रेल्वे गेटपर्यंत रस्ता करणे
९) कोलारे ग्रामपंचायत हद्दीतील साईबाबा मंदिर ते आगरी समाज हॉल पर्यंत रस्ता करणे
१०) नेरळ संकुल विकास प्राधिकरणामार्फत जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत कोणती विकास कामे करण्यात आली त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आला नेरळ संकुल विकास प्राधिकरणात किती निधी शिल्लक आहे व त्या निधीतून कोणती विकास कामे करण्याचे नियोजन केले आहे नेरळ संकुल विकास प्राधिकरणाच्या निधीमधून जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत नेरळ ममदापूर कोलारे ग्रामपंचायत मध्ये करण्यात आलेल्या विकास कामांची व करणार असलेल्या विकास कामांची नावासहित व प्रत्येक विकास कामाला किती निधी मंजूर केलेला यादी मिळावी सदर ची विकास कामे पूर्ण झाली आहेत का याची माहिती मिळावी.

तहसीलदार साहेब यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे विजय हजारे यांची भेट घेतली असता त्यांनी तोंडी आश्वासन दिले. पण जो पर्यत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा विजय यांनी घेतला आहे.