माणगांव तालुक्यातील नांदवी मढेगाव येथे अवैध दारूचे धंदे सुरूच.

✍️-नितेश पुरारकर✍️
गोरेगाव विभाग प्रतिनिधी
📞संपर्क-७०२११५८४६०.
गोरेगाव : – गोरेगाव लोणेरे विभाग आणि नांदवी अवैद्य धंद्यामुळे बदनाम होत आहेत. दारू पिऊन हुल्लड बाजीमुळे नागरिकांची मध्यरात्रीची शांतता भंग होत आहे.नांदवी मढेगाव मध्ये अनेक अवैद्य दारूचे धंदे आहेत.काही बारा महिने तर काही लपुन छपून असे 24 तास सुरू असतात.तात्काळ प्रशासनाने रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
माणगांव तालुक्यातील नांदवी तसेच मढेंगाव येथे अगदी बेकायदेशीर .कोणत्याही प्रकारच्या शासनाच्या परवाना नसताना ही दारू विक्री केली जात आहे.मग त्यामध्ये देशी दारू असेल इंग्लिश दारू असेल बियर सारखे नशील पेय असेल. बेकायदेशीर दारू विक्रेत्यांना कोणत्याही प्रकारचे भय राहिले नाही.मग प्रश्न निर्माण होतो. यांच्या डोक्यावर कोणत्या यंत्रणेचा हात आहे.यांना कोणाचे पाठबळ आहे.आणि का?
हाकेच्या अंतरावर दारू मिळतं असल्याने अनेक घर कुटुंब उध्वस्त होत आहेत. नवी पिढी विकोपाला जाताना दिसत आहे. अल्पवयीन मुलं वेसनाधीन होताना पाहायला मिळत आहे. त्याचं उज्वल आयुष्य दारू मध्ये डूबताना दिसत आहे.दारूचे प्रमाण अति झाल्याने नको त्या आजाराला बळी पडून मुत्यु होताना दिसत आहेत.यांच्या त्रास नवविवाहीत महिला असतील .युवकांचे आई वडील भगिनी असतील यांना होत आहे.
दिवसभर कष्ट करून कमावलेला पैसा हा दारू मागे जात असल्यामुळे गृहिणींना घर मुलंबाळ सांभाळणं कठीण झालं आहे. दारूच्या नशे मध्ये राहून वादविवाद करणे. बायको मुलांना त्रास देणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत.
नांदवी व मढेगावच नव्हे तर आजू बाजूच्या गावातील .मोठया प्रमाणात महिला वर्ग व समाज सुधारक बांधव यांची मागणी आहे.की अवैद्य दारू करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करावी. व हे धंदे कायम स्वरूपी बंद करण्यात यावे.








