Home latest News आमखेडा येथे कृषी दिन उत्साहात साजरा

आमखेडा येथे कृषी दिन उत्साहात साजरा

73

आमखेडा येथे कृषी दिन उत्साहात साजरा

आमखेडा येथे कृषी दिन उत्साहात साजरा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय चंद्रकांत गायकवाड

वाशिम /मालेगांव : -महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्य कृषी दिनाचे औचित्य साधून डॉ.
देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्नित गीताई ह्युमनकाइन डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणे द्वारा संचालित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभव कार्यक्रमात अंतर्गत. जिल्हा परिषदेच्या मा जिजाऊ सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत होत्या यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोद्रे वाशिम पंचायत समिती सभापती रेशमा गायकवाड पंचायत समिती सदस्य बळीराम माहुरे व नारायण घोडके सेंद्रिय शेती कृषी भूषण पुरस्कार विजेत्या राधे श्याम मंत्री व तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडकर यांनी केले प्रास्ताविक त्यांनी कृषी दिन साजरा करण्याचे महत्त्व तसेच कृषी संजीवनी मोहिमेचा संक्षिप्त माहिती दिली विशेष मार्गदर्शक म्हणून पुणे येथील नॅशनल केमिकल या विषयात डॉक्टर एट प्राप्त डॉक्टर संतोष चव्हाण यांनी शेतकऱ्यांना बांधावर जैविक प्रयोगशाळा बाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच कृषी महाविद्यालय विद्यार्थी महेश रमेश धोंडगे व सुयश मधुकर गायकवाड यांचे कार्यक्रमास उस्फूर्त सहकार्य लाभले व या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस . जाधव प्रा.प्रदीप निचळ प्रा. रवींद्र करंगामी व प्रा. अंकुश वाठोरे प्रा. एस .टी.जाधव यांचे मार्गदर्शन लाभले .✍