दिव्यांगांचा खात्यात 5 टक्के कल्याण निधी जमा

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट ०१/११/२१
मागील महिन्याभरापासून स्थानिक नगर परिषद प्रशासनाला 5 टक्के दिव्यांग कल्याण निधी वाटप करण्यासाठी तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी अनिल जगताप यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु, याची दखल नगरपालिका प्रशासनाने घेतली नव्हती. निवेदनाची दखल न घेतल्याने आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु, यश न आल्याने मनसेचे दिव्यांग बांधवांना न्याय देण्यासाठी आज सोमवार 1 रोजी मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत नपा प्रशासनाने दिव्यांगांचा 5 टक्के दिव्यांग कल्याण निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात केला.
यावेळी दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, उपाध्यक्ष गोपाल कांबळे, प्रवीण काळे, अनंता निमजे, रिजवान बेग, विजय अंबादे, नैतिक कुकसे, शरद नांदे, संदीप डोळस, संदीप दंभारे, रमेश कुर्मी, नांदेकर काकाजी इत्यादी दिव्यांग बांधव उपस्थित होते. दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेकदा निवेदने देऊनही याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत होते. परंतु, याचा पाठपुरावा केला असता सोमवारी या मागणीला यश आले. हे यश दिव्यांगांचेच आहे, असे वांदिले यांनी सांगितले.






