Home latest News गंगाबाई हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स डे उत्साहात

गंगाबाई हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स डे उत्साहात

67

गंगाबाई हॉस्पिटलमध्ये
डॉक्टर्स डे उत्साहात

गंगाबाई हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स डे उत्साहात

✍विजेंद्र मेश्राम✍
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
89750 19967

गोंदिया : – एक जुलै नॅशनल डॉक्टर्स डे निमित्त बाई गंगाबाई महिला हॉस्पिटल मध्ये चाळीशी च्या महिलांची मोफत गायनीक तपासणी आधार महिला संघटना तर्फे आयोजित करण्यात आली होती
डॉक्टर्स डे निमित्त या कॅम्प चे उदघाटन माजी नगर पालिका सभापती भावना ताई कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वेळी कॅम्प संयोजिका वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर
डॉ पल्लवी गेडाम ओपीडी विभागाचे नीलम शुक्ला आदी उपस्थित होत्या
1 जुलै डॉक्टर्स डे निमित्त आधार महिला संघटना तर्फे
भावना ताई कदम यांच्या शुभ हस्ते गंगाबाई हॉस्पिटल मधील जेष्ठ सेवाभावी डॉक्टर
सुवर्णा हुबेकर यांचा
पुष्पगुच्छ देऊन सुहृदय सत्कार करण्यात आला
त्यासोबतच आधार च्या सॊ लता बाजपाई यांच्या शुभ हस्ते नीलम शुक्ला व डॉ पल्लवी गेडाम यांचा देखील डॉक्टर्स डे निमित्ताने हार्दिक सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना न प गोंदिया च्या माजी सभापती भावनाताई कदम यांनी गंगाबाई हॉस्पिटलमध्ये प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा रूग्ण सेवा अहर्निशपने करणाऱ्या डॉक्टरांना सलाम केला व डॉक्टर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
डॉक्टर्स डे च्या निमित्याने आयोजित कॅम्प मध्ये मार्गदर्शन करताना डॉ सुवर्णा हुबेकर यांनी आवाहन केले की चाळीशीतील महिलांनी
आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करावी . रक्तदाब रक्त शर्करा तसेच इ सी जी
तपासण्या करून वैद्यकीय सल्ला घ्यावा महिलांना कॅन्सर चा धोका वाढत असल्याने चाळीशीत स्त्रवाची प्याप्स टेस्ट तपासणी तसेच ममोग्राफी करून घ्यावी.विशेष म्हणजे बाई गंगाबाई हॉस्पिटलमध्ये गायनीक विभागात मोफत तपासणी केली जाते
डॉक्टर्स डे निमित्त मेडिकल कॉलेज च्या प्राध्यापक डॉ गरिमा बग्गा आणि प्रधान मंत्री आयुष्यमान योजनेच्या नोडल अधिकारी डॉ जयंती पटले यांचा देखील आधार संघटना तर्फे भावना कदम यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. या कॅम्प मध्ये 32 चाळिशी तील महिलांची एन सी डी सेल तर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व एच एल एल तर्फे रक्त तपासण्या मोफत करण्यात आल्या.