Home मुंबई अजित पवारांचा ‘छिंदम’ झालाय: उद्धव ठाकरे

अजित पवारांचा ‘छिंदम’ झालाय: उद्धव ठाकरे

75

 

मुंबई: शिवसेनेला गांडुळाच्या अवलादीची उपमा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यात भाषेत उत्तर दिले आहे. ‘हक्काचे पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना ‘मूत्र’ पाजण्याची भाषा करणारे अजित पवार यांना सापाची अवलाद म्हणणे हा सापाचा अपमान ठरेल. ही तर छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहे,’ अशी तोफ उद्धव यांनी डागली आहे.
कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शिवसेनेची संभावना ‘गांडुळाची अवलाद’ अशी केली होती. या टीकेमुळं उद्धव ठाकरे प्रचंड संतापले आहेत. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव यांनी अजित पवारांचा अत्यंत शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे.
अजित पवारांचे राजकारण आता बारामतीपुरतेसुद्धा उरलेले नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी त्यांना जवळजवळ माती खायला लावलीच होती. अनेक दिवस ते त्या मातीत गाडलेले तोंड बाहेर काढायला तयार नव्हते. महापालिका निवडणुकीत पुणे व पिंपरी-चिंचवडचे संस्थानही धुळीस मिळाले आहे. राज्याच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदही राहिलेले नाही. त्यांच्या पक्षाचा जीर्ण सांगाडा झाला आहे. तरीही हे सांगाडे ‘हल्लाबोल’ यात्रेच्या नावाखाली उसने अवसान आणत आहेत हा विनोदच म्हणायला हवा.