Home latest News पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेला मिळाला...

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेला मिळाला उत्तम प्रतिसाद

61

पाचोरा तालुक्यातील
पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेला मिळाला उत्तम प्रतिसाद

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेला मिळाला उत्तम प्रतिसाद

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा :- मा.डॉ श्री प्रविण मुंढे साहेब (IPS) पोलीस अधिक्षक जळगांव यांच्या संकल्पनेतून पिंपळगाव हरे. पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांनी जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिम मध्ये सहभाग नोंदवला
सदर कार्यक्रमाचे उदघाट्न मा श्री उपसरपंच सुकदेव तोताराम गीते यांच्यायांच्या हस्ते करण्यात आले.
स्वाक्षरी मोहिमेला पिंपळगाव हरे. तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील इतर गावांतील सर्व राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक संघटना ,धार्मिक संस्थेचे पुजारी, ट्रस्टी , मौलाना , रोटरी क्लब , जॉगिंग ग्रुप , सायकलिंग ग्रुप , शैक्षणिक संस्था , शिक्षक वग॔ , विद्यार्थी , धार्मिक संघटना , शांतता समिती , पोलीस पाटील , वैद्यकीय संघटना , मेडीकल असोसिएशन , शासकीय कार्यालय , पोलीस मित्र , ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य , पत्रकार बंधू , महिला संघटना व सर्व जाती धर्माचे नागरिक , महिला व मुले , सराफा , व्यापारी असोसिएशन , रेडिमेड व कपडा असोसिएशन , प्रिंटींग असोसिएशन सर्व व्यापारी सदस्य व सव॔ पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील संबंधितांनी सहभाव नोंदवुन जवळपास पाचशे स्वाक्षरी फलकावरती केल्या गेल्या
तसेच जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य राखण्यासाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यात दहा गावातील संघांनी सहभाग घेतला आहे. सर्व संघामध्ये विविध जाती धर्माचे खेळाडू खेळत आहे क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा सलग दोन दिवस चालणार आहे. यावेळी प्रमुख उपस्तिती पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मा.महेंद्र वाघमारे पोलीस उपनिरीक्षक मा.अमोल पवार,उपसरपंच सुखदेव गीते,पोलीस हवालदार रणजित पाटील,पोलीस नाईक अरुण राजपूत पोलीस नाईक शिवनारायण देशमुख, पो.को.पंकज सोनावणे,डॉक्टर शांतीलाल जी तेली, रवींद्र गीते,बागवान पाटील,अंतिम महाजन,नानाभाऊ सरकार,सलीम कारागीर,तालिफ शेख,राजु महाजन,राजधर मेटे,विक्रम पाटील सर,रवी बडगुजर,किशोर लोहार,कोमलसिंग देशमुख,शामराव महाजन,पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्तित होते.