म्हसळा येथील घोणसे घाटात भीषण अपघात प्रवासी बस दरीत कोसळून 3 मृत्यू तर 34 जखमी

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघात ग्रस्तांची भेट घेतली असून अपघातग्रस्तांना आवश्यक उपचार देण्याविषयी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत
म्हसळा(रायगड):-रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोणसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे ही बस 8 मे 2022 रोजी सकाळी आठच्या सुमारास 60 फूट खोल दरीत कोसळली आहे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 34 जण जखमी झाले आहेत जखमींवर म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही अतिगंभीर असणाऱ्या जखमींना माणगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी सांगितले आहे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी प्रशासनाने तातडीने धाव घेतली असून सर्व यंत्रणा तात्काळ मदत कार्यास लागली आहे नालासोपारा येथून ही खासगी बस निघाली होती तिचा घोणसे घाटात अपघात झाला असून MH04FK6616 असा या अपघात झालेल्या बसचा नंबर आहे प्राथमिक माहितीनुसार ठाणे येथून श्रीवर्धन येथील म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाणे येथे राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी म्हसळा येथे येत असताना हा अपघात झाला युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे दरम्यान मृतांची ओळख पटविण्याबाबतची कार्यवाही व तपास सुरू करण्यात आला आहे








