जागतिक आदिवासी दिनानिमित्त आरेतील आदिवासीचा सोहळा संपन्न

पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं. – ८१४९७३४३८५
जोगेश्वरी :- ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सुमारे २००० ते २५०० हुन अधिक आरेतील आदिवासीनी सर्वसामान्य मुंबईकरांसह जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणूकीची सुरुवात सकाळी १० वाजता युनिट क्रमांक ५, आरे मार्केट येथून करण्यात आली. मुंबईतील मूल निवासी (आदिवासी )त्यांच्या रंगीबेरंगी पोशाखात एकत्रित आले. महिला वर्ग त्यांच्या डोक्यावर पाने व फुले सजवून या सोहळ्यात सहभागी झाल्या. आरेतील आदिवासीयांनी त्यांचे पारंपरिक नृत्य तारपा आणि ढोलच्या आवाजात सादर केले. रिमझिम पाऊस सुरु असतानाही लहान मुलांसह सर्व आदिवासीनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाग घेऊन उपस्थिती दर्शवली. ठाकरे सरकारच्या काळात स्थागित असलेला आरेतील कार डेपोचा प्रकल्प शिंदे -फडणवीस सरकारने उचलून धरत आरेतच कारशेड होणार या निर्णयाला मंजुरी देऊन आरेमध्ये कारशेडचे काम चालू केले. पण राज्यसरकारच्या या प्रकल्पाला आरेतील आदिवासी व निसर्गप्रेमिनी एकत्रित येऊन विरोध केला व हा मुद्दा न्यायालयापर्येंत नेला. व याबाबतची न्यायलायची पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली. आदिवासी दिनानिमित्त एकत्रित झालेल्या नागरिकांनी आरे जंगल सोडा, आरेमध्ये मेट्रो ३ कारशेड नाही, आरे वाचवा मुंबई वाचवा असे फलक हाती घेऊन कारशेड प्रकल्पाला आपला विरोध दर्शविला. भविष्यात आरे जंगलात येऊ शकणाऱ्या प्रकल्पाची संख्या पाहता येथे राहणाऱ्या आदिवासीवर नेहमीच तणाव असतो. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी आपली संस्कृती, इतिहास आणि समुदाय साजरे करत असले तरी ते सरकारच्या दयेवर आहेत.
आदिवासी दिनानिमित्त मुंबईचे मूळ निवासी व मालक आदिवासीच आहेत हे जगाला दाखवण्याचे कार्य मिरवणूकीच्या माध्यमातून केले गेले. या मिरवणूकीचा समारोप शहीद वीर – बिरसामुंडा चौक, पिकनिक पॉईंट येथे करण्यात आला.








