Home latest News बेला पोलिसांना ३८ गोवंशांना वाचविण्यात यश आले.

बेला पोलिसांना ३८ गोवंशांना वाचविण्यात यश आले.

51

बेला पोलिसांना ३८ गोवंशांना वाचविण्यात यश आले.

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953

नागपूर :- बेला.स्थानिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवैधरीत्या कत्तलीसाठी जात असलेल्या ३८ गोवंशांना वाचविण्यात यश आले. ही कारवाई बुधवारी (७जानेवारी) उमरेड-सातखेडा मार्गावर रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंगदरम्यान करण्यात आली.

गोवंश कत्तलीसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर हवालदार असलम औरंगबादे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रक तपासणीसाठी पाठलाग केला. उमरेडकडून येत असलेल्या टाटा आयशर ट्रक क्रमांक एमएच ४९/एटी २७८१ च्या चालकाने पोलिसांना पाहून पळ काढला. ट्रक मार्गालगत उभा करून चालक पसार झाला. पोलिसांनी तपासणी केली असता पांढरे गोहे

आठ (प्रत्येकी अंदाजे किंमत आठ हजार), लाल गोहे पाच (प्रत्येकी किंमत आठ हजार), पांढऱ्या कालवडी चार (प्रत्येकी किंमत सात हजार), लाल कालवडी चार (प्रत्येकी किंमत सात हजार) आणि लाल गाई सात (प्रत्येकी किंमत सात हजार), असे एकूण ३८ गोवंश अत्यंत क्रूरतेने एकमेकांना बांधलेली व कोंबलेली आढळली. या गोवंशाची एकूण किंमत दोन लाख ८२ हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी ट्रक आणि गोवंश जप्त करून पसार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी बेला पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश नासरे यांच्या मार्गदर्शनात हवालदार खंडेराव बोडगीर, असलम औरंगबाद, अमोल कोठेवार आणि नितेश उपरे करीत आहेत