Home latest News गंभीर आजाराने ग्रस्त महिलेला आर्थिक सहकार्य करुन दिला मदतीचा हात….
गंभीर आजाराने ग्रस्त महिलेला आर्थिक सहकार्य करुन दिला मदतीचा हात….
जितेंद्र नागदेवते
सिन्देवाही प्रतिनिधी 8806689909
सिंदेवाही :- स्थानिक तालुक्यातील पळसगांव जाट येथील माधुरी लांजेकार या महिलेस गंभीर आजाराने ग्रासल्याची माहिती येथील स्थानिक प्रतिष्ठित महिला संगिता बोरकर यांचे माध्यमातून समाजसेवी आशिष भाऊ सहारे यांना कळताच त्यांनी तात्काळ ग्रामस्थ मान्यवरांकडून मदत गोळा करुन सदर विधवा महिलेच्या घरी जाऊन विचारपूस केली व आर्थिक मदत देऊन सामाजिक दायित्व निभावले.
याप्रसंगी नरेंद्रजी बोरकर, विलासजी कोलते, सुभाषजी कोलते, सुभाषजी सुकारे, जगदिशजी कामडी, अशोकजी उदासी, प्रशांत बनकर, भास्कर लांजेकार, व इतर ग्रामस्थ मान्यवरांचे आर्थिक स्वरुपात सहकार्य लाभले