Home latest News शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरीब रूग्णांचे हाल, कार्यरत डॉक्टरांचा तुघलकी कारभार… •...

शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरीब रूग्णांचे हाल, कार्यरत डॉक्टरांचा तुघलकी कारभार… • औषधसाठा उपलब्ध असतानाही बाहेरून औषध आणण्याचा दिला जातोय् सल्ला

103

शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरीब रूग्णांचे हाल, कार्यरत डॉक्टरांचा तुघलकी कारभार…

• औषधसाठा उपलब्ध असतानाही बाहेरून औषध आणण्याचा दिला जातोय् सल्ला

शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरीब रूग्णांचे हाल, कार्यरत डॉक्टरांचा तुघलकी कारभार... • औषधसाठा उपलब्ध असतानाही बाहेरून औषध आणण्याचा दिला जातोय् सल्ला

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 11 जून
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रूग्णालयात कुत्रा चावल्यानंतर दिल्या जाणार्‍या लसीचा साठा उपलब्ध आहे. पण आलेल्या गोरगरीब रूग्णांची कार्यरत डॉक्टर, परिचारिक बोळवण करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रूग्णालयात इंजेक्शन उपलब्ध असतानाही ते दिले जात नाही. याउलट त्यांना थेट खासगीतून इंजेक्शन घेण्याचा सल्ला देतात. कार्यरत डॉक्टरांच्या या तुघलकी कारभारामुळे सर्वसामान्य रूग्णांचे हाल होत आहेत.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील रहिवासी असलेल्या एका 12 वर्षाचा मुलाचा कुत्र्याने एक नव्हे तर तीनदा चावा घेतला. मुलाच्या वडिलाने बल्लारपूर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पण तिथे इंजेक्शन उपलब्ध नव्हते. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रूग्णाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठले. येथे कार्यरत परिचारिकेला वडिलाने मुलाची आपबिती कथन केली. त्या परिचारिकेने आमच्याकडे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगितले. खासगीतून औषधालयातून घ्या, मी लावून देते, असाही सल्ला दिला. त्यानंतर मुलगा व वडिलांनी महाविद्यालयातील 30 क्रमांकाची खोली गाठली. तिथे कार्यरत डॉक्टरांची भेट घेतली. थोडा वेळ बसा इंजेक्शन मिळेल, असा सल्ला दिला. जवळपास तासभर ते इंजेक्शनच्या प्रतिक्षेत रूग्णालयात बसले. त्यानंतर दुसरा रूग्ण तिथे आला. त्यालाही कार्यरत डॉक्टर व परिचारिकेने खासगीतून इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती बरी होती. त्याने लगेच खासगी औषधालयातून इंजेक्शन आणले. त्यानंतर त्याच इंजेक्शनमधील 4 एमएल इंजेक्शन कुत्रा चावलेल्या दोन्ही मुलांना देण्यात आले.
यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांना विचारणा केली असता, त्यांनी रूग्णालयात एक महिना पुरेल इतका साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. तर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी, आपल्याकडे 4 हजार इंजेक्शन उपलब्ध आहेत. बल्लारपूर रूग्णालयात इंजेक्शन कदाचित नेल्या नसतील. त्याची चौकशी करून त्यांना इंजेक्शन नेण्याचे निर्देश दिले जातील, असे सांगितले.

• चौकशी करून दोषींवर कार्यवाही करू – डॉ. कांबळे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कुत्रा चावल्याच्या इंजेक्शनचा साठा किमान महिनाभर पुरेल इतका उपलब्ध आहे. इंजेक्शन उपलब्ध असताना ग्रामीण भागातून आलेल्या रूग्णांना इंजेक्शन का दिल्या गेले नाही, खासगीतून का बोलावण्याचा सल्ला दिला याबाबतची आपण चौकशी करू. चौकशीअंती दोषींवर योग्य ती कार्यवाही केल्या जाईल, अशी प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिली.