Home latest News गोवंशीय जनावरांचे कत्तली पासून बचाव, नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाही

गोवंशीय जनावरांचे कत्तली पासून बचाव, नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाही

73

गोवंशीय जनावरांचे कत्तली पासून बचाव, नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाही

गोवंशीय जनावरांचे कत्तली पासून बचाव, नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाही

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

नेरळ :- नेरळ दिनांक ११ जून २०२४ रोजी सकाळी ०७.४५ वाजता मौजे माले गावाचे हद्दीत तालुका कर्जत येथे छोटा हत्ती टेम्पो क्रमाक एम-एच. ४६-बि.यु.-७२६१ असा टेम्पो हा गोवंशीय जनावरे घेऊन जात असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळताच नेरळ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी अधिक विलंब न लावता टीम तयार केली व टेम्पोला पकडून आरोपी यासीम युनिस सुरमे राहणार चिकनपाडा यास विचारपूस केली असता गाडीतील गोवंशीय जनावरे त्यांनी चोरून आणली असून कत्तली साठी नेत असल्याची कबुली दिली म्हणून यासीम सुरमे याच्यावर १३२/२०२४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले असून भा.द.वी. ३६९ सह प्राणी स्वंरक्षण कायदा कलम 5(अ), ५ (ब) चे उलंघनल ९ सह प्राण्यांना कृरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११, (१), (घ), (ड), (ज) प्रमाणे नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला असून तीन गोवंशीय जनावरे गोशाळेत सुखरूप ठेवली आहेत. तसेच एकूण २,४५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस हवालदार (२०२७) नवनाथ म्हात्रे व टीम यांनी केली म्हणून सर्व स्थारावरून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. तर प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी कायदा व सुव्यवस्था च्या दृष्टीने कारवाही करीत असल्याने गोवंशीय जनावरांचे कत्तली साठी नेणाऱ्यांचे धाबे दाणादले आहेत.