केज नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन! लग्नसमारंभ आणि बँक परिसरात ‘पिक पॉकेटिंग’ करणाऱ्या सराईत टोळीचा वावर

77

त्वरित पोलिसांना कळवा, पोलीस निरीक्षक स्वप्निल उणवने !

नंदकुमार मोरे! बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी: केज शहरात सध्या सराईत गुन्हेगार सक्रिय असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली आहे. लग्नसमारंभ, बाजारपेठा आणि विशेषतः बँक परिसराबाहेर थांबून नागरिकांचे खिसे कापणे (पिक पॉकेटिंग) आणि रोकड चोरी करणाऱ्या एका टोळीचा शहरात वावर असल्याची गंभीर सूचना पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवने यांनी दिली आहे.

या टोळीतील तीन मुख्य आरोपींची नावे आणि तपशील पोलिसांकडून जाहीर करण्यात आला आहे, जेणेकरून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि त्यांच्या हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.

आरोपींची नावे व ओळख:

बादल कृष्णा सिसोदिया (वय अंदाजे १८, रा. जाठखेडी)

जास्वंत मनिलाल सिसोदिया (रा. कडिया, जि. रायगड)

या आरोपींचा संबंध MP04, MP09, MO39 या क्रमांकांशी असलेल्या गुन्हेगारी कृत्यांशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चोरीची पद्धत:

हे आरोपी प्रामुख्याने लग्नाच्या समारंभात गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे खिसे कापतात. तसेच, ते बँकेच्या बाहेर थांबून बँकिंग व्यवहार करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवतात आणि संधी मिळताच त्यांची बॅग अथवा रोकड घेऊन पळून जातात.

पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवने यांचे नागरिकांना आवाहन:

शहरातील सर्व नागरिकांनी अत्यंत काळजी घ्यावी. लग्नसमारंभ किंवा बँक व्यवहार करताना विशेषतः सावधानता बाळगावी. जर वरील वर्णनाचे किंवा संशयास्पद हालचाली असलेले व्यक्ती शहरात किंवा परिसरात आढळल्यास, नागरिकांनी त्वरित केज पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून माहिती कळवावी.

नागरिकांच्या सतर्कतेनेच या गुन्हेगारांना पकडणे शक्य होईल आणि शहरात शांतता व सुरक्षितता टिकेल, असे आवाहन पोलीस प्रशा

सनाने केले आहे.