Home latest News जागतिक एड्स दिनानिमित्त रांगोळी व चित्रकला स्पर्धा संपन्न

जागतिक एड्स दिनानिमित्त रांगोळी व चित्रकला स्पर्धा संपन्न

61

जागतिक एड्स दिनानिमित्त रांगोळी व चित्रकला स्पर्धा संपन्न

किल्ले धारूर (वा): मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब व सांस्कृतिक विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त रांगोळी व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. रांगोळीच्या माध्यमातून एचआयव्ही आजार व त्याचे दुष्परिणाम यासंबंधी जागृती घडविण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक समीक्षा राजाभाऊ पवार, द्वितीय क्रमांक सुप्रिया राम मोरे, तृतीय क्रमांक वैष्णवी अशोक साळवे तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अमन बेग, द्वितीय क्रमांक मोरे सुप्रिया राम, तृतीय क्रमांक चोले प्रियंका बळीराम या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश संपादन केले. त्यांच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

सर्व स्पर्धकांचे प्राचार्यांनी अभिनंदन केले. तसेच यावेळी उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सच्चिदानंद ढेपे, प्रा. नागोराव वाघमारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाधिकारी डॉ. विजयकुमार कुंभारे व कार्यक्रमाधिकारी प्रा. बालासाहेब जोगदंड व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनायक कापावार यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.