Home latest News गावकर्‍यांनी कोळसा वाहतूक रोखली

गावकर्‍यांनी कोळसा वाहतूक रोखली

90

गावकर्‍यांनी कोळसा वाहतूक रोखली

गावकर्‍यांनी कोळसा वाहतूक रोखली

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा

चंद्रपूर : 12 जून
बल्लारपूर क्षेत्रांतर्गत सास्ती व धोपटाळा खुल्या कोळसा खाणी सास्ती गावाला लागून आहे. या खाणीतील तीव्र स्फोटामुळे सास्तीवासीयांना भूकंपसदृश हादरे सोसावे लागत आहेत. रविवारी स्फोटामुळै विक्रम आकापाका व राजेश्वर आकापाका यांच्या घराचा छत क्षतीग्रस्त झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे. सरपंच सूचिता अश्विन मावलीकर यांनी पाहणी करून भरपाईसाठी वेकोलिकडे पाठपुरावा केला. परंतु, अधिकारी फिरकले नाही. अखेर गावकरी सरपंच मावलीकर यांनी कोळसा वाहतूक रोखून धरताच वेकोलि अधिकार्‍यांनी घरांची पाहणी केली व घराची दुरुस्ती करून देण्याचे मान्य केले. यावेळी सुभाष बोंगीरवार, राजकुमार भोगा, पूजा गुंटी, अश्विन माऊलीकर, राजू निषाद, कैलास ताला, शंकर राजूकर आदी उपस्थित होते.