Home latest News बामणी प्रोटीन व्यवस्थापनाच्या विरोधात बेमुदत धरणे • कामगारांच्या साथीला त्यांचे कुटुंबही...

बामणी प्रोटीन व्यवस्थापनाच्या विरोधात बेमुदत धरणे • कामगारांच्या साथीला त्यांचे कुटुंबही उतरले आंदोलनात

118

बामणी प्रोटीन व्यवस्थापनाच्या विरोधात बेमुदत धरणे

• कामगारांच्या साथीला त्यांचे कुटुंबही उतरले आंदोलनात

बामणी प्रोटीन व्यवस्थापनाच्या विरोधात बेमुदत धरणे • कामगारांच्या साथीला त्यांचे कुटुंबही उतरले आंदोलनात

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

बल्लारपूर : 12 जून
तालुक्यातील बामणी प्रोटीन उद्योगाच्या व्यवस्थापनाविरोधात भारतीय केमिकल वर्कर्स युनियनच्या नेतृत्वात कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.
बामणी प्रोटीन्स लिमिटेड हा उद्योग सन 1998 पासून अविरतपणे सुरू असून, या उद्योगात जवळपास 200 ते 250 स्थायी व अस्थायी कामगार कार्यरत आहे. परंतु, चंद्रपूर येथील राजेश बेले यांच्या प्रदूषण विषयक तक्रारीवरून प्रदूषण नियामक मंडळाने 13 मार्च 2024 रोजी या उद्योगावर ‘लॉक आउट’ची कारवाई केली आणि रितसर सुधारणा करून उद्योग पूर्ववत सुरु करण्याचे निर्देश दिले. परंतु, कंपनी व्यवस्थापनातर्फे प्रदूषण नियामक मंडळाच्या सुधारणा सूचनांचे पालन करून उद्योग सुरू करण्याकरिता कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाही. प्रदूषण विषयक सुधारणा केल्यानंतर उद्योग पूर्ववत सुरू करणे अपेक्षित होते. परंतु, व्यवस्थापनाने तसे न करता नफ्यात असलेला उद्योग आर्थिक आणि तांत्रिकद़ृष्ट्या चालवण्यास असमर्थ असल्याचे कारण सांगून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात संघटनेने केलेल्या मागणीनुसार पालकमंत्री यांनी व्यवस्थापन आणि संबंधित विभाग यांची बैठक घडवून आणली. या बैठकीत अधिकार्‍यांनी उद्योग सुरू करण्याकरिता वर्तमान परिस्थितीमध्ये असलेल्या परवानगीवर किंवा इतर पर्यायावर विचार करण्याचे सूचना देण्यात आल्या. परंतु, व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसूचना न देता 19 मे 2024 ला मध्यरात्री कंपनीच्या प्रवेशद्वारा बेकायदेशीररित्या टाळे लावून सर्व कामगारांच्या सेवा समाप्तीच्या आणि त्यांच्या उर्वरित देय रकमेच्या उल्लेख केलेले पत्र कंपनीच्या प्रवेशद्वारावर लावले. व्यवस्थापनाने घेतलेल्या या एकतर्फी निर्णयाविरोधात कामगारांनी भारतीय केमिकल वर्कर्स युनियनच्या नेतृत्वात 20 मे पासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरूवात केली आहे.