Home latest News सरपंच, उपसरपंचाविरूद्धचा अविश्वास प्रस्ताव ठरला निष्फळ

सरपंच, उपसरपंचाविरूद्धचा अविश्वास प्रस्ताव ठरला निष्फळ

77

सरपंच, उपसरपंचाविरूद्धचा अविश्वास प्रस्ताव ठरला निष्फळ

सरपंच, उपसरपंचाविरूद्धचा अविश्वास प्रस्ताव ठरला निष्फळ

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

विसापूर : 12 जून
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंच यांच्याविरूद्धच्या अविश्वास प्रस्तावावर बुधवारी ग्राम पंचायतमध्ये सभा पार पडली. या सभेत चार सदस्यांनी सरपंच, उपसरपंच यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव बारगळला. आता पुन्हा सरपंच वर्षा कुळमेथे, तर उपसरपंच अनकेश्वर मेश्राम कायम राहणार आहेत.
बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या 17 आहे. अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार सतीश साळवे, मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे, तलाठी अजय नोकरकार व ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते यांनी विशेष सभेला सुरुवात केली. सभेच्या प्रारंभी सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या अविश्वास प्रस्तावावर मतदान हात उंचावून घेण्यात आले. यामध्ये अविश्वास नको म्हणून 7 ग्रामपंचायत सदस्यांनी बाजू घेतली. यामध्ये 10 ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वासाचे अनुमोदन करून मतदान केले. यावेळी अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करणारे गजानन पाटणकर, विद्या देवळकर, शशिकला जीवने व प्रदीप गेडाम यांनी सरपंच, उपसरपंच यांच्या बाजूने मतदान केले.
उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांचेवरील अविश्वास प्रस्ताव दरम्यान ग्रामपंचायत सदस्य सूरज टोमटे, दिलदार जयकर, सरपंच वर्षा कुळमेथे, विद्या देवळकर, शशिकला जीवने व गजानन पाटणकर यांनी ठराव पारित करण्याच्या बाजूने मतदान केले. तर उपसरपंचावरील अविश्वास ठराव पारित होऊ नये यासाठी शारदा डाहुले, रिना कांबळे, सुवर्णा कुसराम, वैशाली पुणेकर, हर्षला टोंगे, संदीप काकडे, सरोज केकती, सुरेखा इटनकर, सुनील रोंगे, प्रदीप गेडाम यांनी मतदान करून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांना अविश्वास ठरावापासून वाचविले.