*राजुरा शहर शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन*
*शहरात बंदला व्यापाऱ्यांचे सहकार्य*

*शहरात बंदला व्यापाऱ्यांचे सहकार्य*
खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनिधी
8378848427
लखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राजुरा शहरात शहर शिवसेनेच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
*जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आणि शहर प्रमुख निलेश गंपावार* यांच्या पुढाकाराने बाईक घेऊन शहरातील शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
केंद्र सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध करत शहरात बंदला यशस्वी करण्यात आले.
येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शहरात काढण्यात आलेली बाईक रॅली आकर्षक ठरली.
या बंदला यशस्वी करण्याकरिता राजुरा विधानसभेचे समन्वयक बबन उरकुडे,तालुका समन्वयक वासुदेव चापले, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, माजी शहर प्रमुख भुमन सल्लम,माजी संघटक नरसिंग मादर, रमेश पेटकर सरपंच सास्ती,युवासेना पदाधिकारी कुणाल कुडे, स्वप्नील मोहुर्ले,रोहित नलके, आणि शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








