Home latest News ब्रेकिंग न्युज *आदिवासीच्या जागेवर अतिक्रमण करून बालोद्यान तयार करण्यासाठी साथ देत...

ब्रेकिंग न्युज *आदिवासीच्या जागेवर अतिक्रमण करून बालोद्यान तयार करण्यासाठी साथ देत असलेल्या महसूल विभागाचा काळे झेंडे दाखवून केला निषेध* बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष संतोष कुलमेथे यांनी केला निषेध

71

ब्रेकिंग न्युज

*आदिवासीच्या जागेवर अतिक्रमण करून बालोद्यान तयार करण्यासाठी साथ देत असलेल्या महसूल विभागाचा काळे झेंडे दाखवून केला निषेध*

बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष संतोष कुलमेथे यांनी केला निषेध

✍संतोष म मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

बामनवाडा येथील सर्वे नं. 173 वर बेकायदेशीर पणे बालोद्यान करून आदिवासीची जागा हडप करून बलोध्यानाचा लोकार्पण करण्याचा कार्यक्रम आज दिनांक 10/10/2021 ला सर्वानंद वाघमारे यांनी ग्रामपंचायत च्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्याचा प्रयत्न करीत असून सदर कार्यक्रमाचे ठिकाणी जांगोदेवी असल्याने आदिवासींच्या भावना दुखाविण्याचे सर्रास काम आयोजकांकडून होत आहे.

याचा तीव्र निषेध करून बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष संतोष कुलमेथे यांनी काळे झेंडे दाखविले आहे.

सदर लोकार्पण सोहळ्याला खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे नमूद आहे. तसेच प्रशासकीय अधिकारी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे वाघमारे यांनी नमूद केले असून वाघमारे यांनी या सर्व नेते मंडळी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची दिशा भुल करीत असून सदर बालोद्यान एकेकाळी आदिवासीची असलेली जमीन आता गायरान असलेल्या जागेवर बेकायदेशीर असलेल्या बालोद्याना च्या नावाखाली अतिक्रमण करून जागा हडप करण्याचा प्रयत्न केले असल्याने जिल्हाध्यक्ष संतोष कुलमेथे यांनी कार्यवाहीची मागणी केली असून

तत्कालीन तहसीलदार राजुरा यांनी अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले आहे. मात्र वाघमारे यांनी तहसीलदार यांच्या आदेशाला ठेंगा देत शासनाला न जुमानता नियम धाब्यावर बसवून सदर कार्यक्रम घेत असून वाघमारे हे एका नामांकित शाळेत बाबू म्हणून सेवा देत असून शासनाचा पगार घेतात असे असताना असे गैर कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर राजकीय नेते मेहेरबान असल्याने प्रशासन दबलेल्या अवस्थेत आहे. यामुळे महसूल विभाग सदर अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करणार काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.