गोंदिया दि. १२ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, गोंदिया यांच्या वतीने बुधवारी १३ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक २१०, आमगाव रोड, गोंदिया येथे होणार आहे.
या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योजक, नियोक्ता आणि प्लेसमेंट एजन्सी सहभागी होणार असून इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळणार आहे.
दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर बेरोजगार युवक-युवतींसाठी ही सुवर्णसंधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या नोंदणी कार्डसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ०७१८२-२९९१५० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा gondiyarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.
या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. रा. ना. माटे यांनी केले आहे.









