Home latest News गोरेगाव येथे श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर...

गोरेगाव येथे श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

10

गोरेगाव येथे आज “रवी दर्शन” या नवीन सभागृहात परमपूज्य श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त तसेच The Art of Living Foundation च्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या रक्तदान शिबिरात ३० हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे महिला रक्तदात्यांनीही मोठ्या उत्साहाने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित केली. संपूर्ण शिबिरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमादरम्यान गोरेगाव परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले. आयोजकांनी केलेल्या नियोजनाचे व समाजहितासाठी राबविलेल्या कार्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.

रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.गोरेगाव आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने रक्तदाते, मान्यवर तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानण्यात आले.

राम भोस्तेकर | माणगाव प्रतिनिधी