Home latest News स्कुल चले हम… शाळेची घंटा वाजली राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा...

स्कुल चले हम… शाळेची घंटा वाजली राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा आजपासुन सुरु शाळांमध्ये एकु येणार विद्यार्थ्यांचा किलबिलाट

73

स्कुल चले हम… शाळेची घंटा वाजली

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा आजपासुन सुरु

शाळांमध्ये एकु येणार विद्यार्थ्यांचा किलबिलाट

स्कुल चले हम... शाळेची घंटा वाजली राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा आजपासुन सुरु शाळांमध्ये एकु येणार विद्यार्थ्यांचा किलबिलाट

✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७ १७७१📞

म्हसळा: राज्य सरकारच्या प्राथमिक व . माध्यमिक शाळा आजपासुन सुरु होत असुन विद्यार्थ्यांचे आज शाळांमध्ये जंगी स्वागत करण्यात आले, उन्हाळी सुट्टी नंतर १६ जुन पासुन राज्यातील अनेक शाळांची घंटा वाजली असुन विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पून्हा एकदा शाळा गजबजणार असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे.म्हसळा तालुक्यातील अनेक शाळेचा पहिला दिवस म्हणजे प्रवेशोत्सव म्हणुन साजरा करण्यात आला, जिल्हा परिषद, नगरपंचायत, तसेच खाजगी शाळांमध्ये ठिक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद पुढे येऊन गुलाब पुष्प देऊन विदयार्थी यांचे स्वागत करण्यात आले, तसेच पहिल्या दिवशी शालेय पुस्तक वाटप करण्यात आली. त्याच प्रमाणे नवगतांचे स्वागत देखील करण्यात आले. शालेय शिकणातील २०२४ – २५ हे शैक्षणिक वर्ष १६ जुन पासुन सुरु होत असताना शाळांना शिक्षण विभागा कडुन विविध सुचना देखील देण्यात आल्या आहेत.
…………………………………,.
आज तालुक्यातील ठिक ठिकाणच्या शाळांमध्ये नवगतांचे स्वागत करण्यात आले असून शिक्षकांची, पालकांची, गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष व विद्यार्थ्यांची उपस्थिती देखील लक्षणिय होती. विद्यार्थ्यांच्या मध्ये उत्साह दिसत होता. ज्या प्रकारे पहिल्या दिवशी शिक्षकांनी उत्तम प्रकारे उपस्थिती दर्शविली आहे, त्याच प्रमाणे शिक्षकांनी वर्षभर उपस्थिती दाखवुन विदयार्थ्यांच्या मध्ये शैक्षणिक आवड निर्माण करून उत्तम विदयार्थी घडवावे.
संतोष दौंड
गटशिक्षणाधिकारी
पंचापत समिती, म्हसळा.