स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडले होते बांधकाम; पोलीसांची होणारी कारवाही नको म्हणून शेतकऱ्यांनी घेतली माघार

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
खांडस :- कशेळे खांडस राज्य मार्ग रस्त्यावर खांडस गावाचे अलीकडे असलेल्या पुलाचे बांधकाम सुरू होते. मात्र त्या पुलाचे बांधकाम तेथील शेतकरी करून देत नव्हता. त्यावेळी खांडस ग्रामस्थांचा त्या नाल्यातून तातपुरता मार्ग बनविला होता. परंतु पावसाच्या पाण्याने तो मार्ग बंद झाला. शेतकऱ्यामुळे पुलाचे काम अर्धवट राहिले आणि शेवटी पाऊस सुरू झाल्याने पुलाच्या खालून वाहणारा नाला देखील दुथडी भरून वाहू लागला. व मार्ग देखील बंद झाला. मंगळवारी आणि बुधवारी ही परिस्थिती खांडस गावात निर्माण झाली होती. त्यावेळी गावात जाण्यासाठी कोणत्याही पर्यायी मार्ग नसल्याने ग्रामस्थांनी शेवटी त्या शेतकऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणचे ऐकले नाही.
दरम्यान स्थानिक शेतकरी कोणाचेही ऐकून घेत नसल्याने शेवटी पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने पोलीस ठाणे गाठले. दरम्यान पोलिसांनी पुलाचे काम अडवणाऱ्या शेतकऱ्यांची समजूत काढली. शेवटी सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्या शेतकऱ्याने माघार घेतली. त्यानंतर ठेकेदाराने दिवस रात्र काम करून पुलाचे अर्धवट असलेले बांधकाम पूर्ण केले. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या अर्धवट असलेल्या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी दाखवलेली तत्परता यामुळे गावात जाण्याचा मार्ग तयार झाला आहे.








