Home latest News उमटे धरणाची संरक्षण भिंत धोकादायक,भगदाड पडण्याची भिती उमटे धरण फुटीच्या आपत्तीला...

उमटे धरणाची संरक्षण भिंत धोकादायक,भगदाड पडण्याची भिती उमटे धरण फुटीच्या आपत्तीला जबाबदार कोण? सामाजिक कार्यकर्ते ऍड राकेश पाटील यांचा प्रशासनाला संतप्त सवाल

114

उमटे धरणाची संरक्षण भिंत धोकादायक,भगदाड पडण्याची भिती

उमटे धरण फुटीच्या आपत्तीला जबाबदार कोण? सामाजिक कार्यकर्ते ऍड राकेश पाटील यांचा प्रशासनाला संतप्त सवाल

उमटे धरणाची संरक्षण भिंत धोकादायक,भगदाड पडण्याची भिती उमटे धरण फुटीच्या आपत्तीला जबाबदार कोण? सामाजिक कार्यकर्ते ऍड राकेश पाटील यांचा प्रशासनाला संतप्त सवाल

अलिबाग
रत्नाकर पाटील
9420325993

अलिबाग :- अलिबाग तालक्यातील उमटे धरणाची आजमितीस भयावह अवस्था झाली आहे. धरणाच्या संरक्षण भिंतीचे दगड निखल्ल्याने भगदाड पडन्याची शक्यता असल्याने धोकादायक झाली आहे.उमटे धरणातील पाण्यावर जवळ पासची 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्या निर्भर आहेत.

कोकणसह रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचे प्रमाण सर्वाधिक आहे,अशातच हजारो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या काही धरणांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे,या पैकी एक असलेले अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाची ओव्हरपलोची भित कोणत्याही क्षणी फुटून हाहाहाकार माजण्याची भीती वर्तवली जात आहे,असे घडल्यास उमटे धरण फुटीच्याआपत्तीला जबाबदार कोण?असा संतप्त सवाल अँड राकेश पाटील उमटे धरण संघर्ष समिती यांनी यांचा जिल्हा प्रशासनाला केला आहे.

अँड पाटील यांनी आज दिनांक 14मे रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी रा.जि.परिषद,कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,तसेच रायगड जिल्हाधिकारी यांना उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने निवेदन दिले असून त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की,अलिबाग तालुक्यातील 47 गावे व 33 वाडया ह्या उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबुन आहेत. सदरच्या उमटे धरणची निर्मीती ही 1978 साली करण्यात आली असुन सदरचे धरण जीवन प्राधिकरणामधुन रायगड जिल्हा परिषदेस 1995 साली हस्तांतरीत झाले आहे.

सदर उमटे धरणाच्या बांधकामानंतर धरणाच्या संरक्षण भिंतींची व बांधाची दुरूस्ती कधी आणि केंव्हा झाली याची माहिती स्थानिकांना नाही. तसेच धरणाच्या दुरूस्तीवर किती खर्च झाला आहे याचीही माहिती स्थानिकांना नाही.

उमटे धरणाची व धरणाचे संरक्षण करणाऱ्या भिंतींची व बांधाची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. सन 2017 ते 2019 पासुन आपल्या कार्यालयात धरणाच्या संरक्षण भिंतींच्या दुरावस्थेबाबत तक्रार अर्ज करूनही काेणतीही कारवाई केली जात नाही.

त्यामुळे पावसाळयांत धरणाच्या ओव्हरफ्लाेची संरक्षण भिंतीच्या खालची माती खचून दगडांची भिंत शेवटची घटका माेजत असून सदरची संरक्षण भिंत या पावसाळयात वाहून जाऊ न धरण तुटून माेठी हानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने धरणाचे आणि धरणाच्या संरक्षण भिंतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ करणे आवश्यक आहे.

काेकणासह रायगड जिल्ह्यात आपत्तीच्या घटना घडलेल्या आहेत. त्या राेखण्यासाठी सरकार आणि प्रशासन आपत्ती घडल्यावर उपाय याेजना करतात. त्यामुळे अशी आपत्ती घडण्याआधीच 47 गावे व 33 वाडया अंदाजे 3 लाखांच्या वर लाेक प्रभावित हाेण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे तातडीने उमटे धरणाची व धरणाच्या संरक्षण बांधांचे व भिंतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ करून ओव्हरफ्लाेच्या भिंतीचे तात्काळ बांधकाम करून धरणाचे
संरक्षण करण्यात यावे अशी मागणी निवेदना द्वारे केली आहे,
——————————————–
उमटे धरण दुरुस्ती आणि गाळउपसा या प्रश्ना वर आम्ही वर्षनुवर्षे प्रशासनकडे अर्ज विनंत्या करूनही प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे,अशातच पावसाळ्यात काही मोठी दुर्घटना होऊन जीवित हानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत,
अँड,राकेश पाटील,
उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड