Home latest News सत्तरीच्या घरांतील आजोबांनी एकत्र येऊन साजरा केला गेट टू गेदर .

सत्तरीच्या घरांतील आजोबांनी एकत्र येऊन साजरा केला गेट टू गेदर .

183

सत्तरीच्या घरांतील आजोबांनी एकत्र येऊन साजरा केला गेट टू गेदर .

सत्तरीच्या घरांतील आजोबांनी एकत्र येऊन साजरा केला गेट टू गेदर .

✍️संतोष उध्दरकर ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा:मैत्री म्हणजे असं एक नातं ज्यात विश्वास, जिव्हाळा,आपुलकी,निस्वार्थ सर्व काही असतंच परंतु काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते ती खरी मैत्री असते. ह्याच मैत्रीच्या महाड येथील वि ह परांजपे हायस्कूल च्या १९७१ च्या म्हणजे ११ वी च्या ssc बँचचा . गृपचे मैत्रीच ५२ वर्ष वयोमान असलेल्या या सत्तरीच्या आजोबा मित्रांचीssc बॅच चा गेट टुगेदर प्रोग्राम सलग दुसऱ्या वर्षी लाडवली येथील सुधाकर मांडवकर यांच्या हॉटेल अंगण मध्ये तब्बल दोन दिवस पार पडला . दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमांत फक्त सकारात्मक चर्चा ह्या मुख्य हेतूने चर्चात्मक मजा लूटली ,एकमेकानी आपली छोटी छोटी सकारात्मक गुपिते ज्यांना-ज्यांना आठवणीत येतील त्यांनी नाट्यमय सादर करायची असे अवाहन विजय उर्फ बाळू देशपांडे यांनी केले त्याला सर्वांनी दाद देत गृपमध्ये प्रथमच सामिल झालेले बाळू देशपांडे,नितीन दोसी ह्यानी आणि नंतर नंदा शेठ,सुधीर गंद्रे,दीपक कोटिया ,संजय खांबेटे ,नंदू मेहता,शेखर वाडकर,विनायक खोडके, अविनाश टक्के, सुशील कडू संतोष वारगे , प्रदीप गांधी ,मोहन पाटेकर सुधीर जाधव , माधव उर्फ पप्पू मुंदडा , दीपक देसाई,निरंजन गुप्ते , शिरीष वारंगे आशा सर्वानी आत्यंत भावनात्मक प्रसंग सांगत आपापली मैत्री घट्ट केली, यावेळी शिक्षणासाठी म्हसळा तालुक्यांतून महाड मध्ये ९ वी पासून शिकत आसलेल्या संजय खांबेटे यानी मित्र बाळू देशपांडे आणि त्याच्या कुटुंबीयानी आपुलकीने केलेले सहकार्य , महाडकरानी दिलेले प्रेम अत्यंत भावनात्मक कथन केले .यावेळी १९ मित्र उपस्थित होते .मैत्री हे अस नातं ज्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. मैत्रीची परिभाषा ही प्रत्येका नुसार वेगवेगळी असते असे भावनात्मक उद्‌गार यावेळी बहुतांश मंडळीनी काढले क्लास,कॉलेज, ग्राऊंड आशा सर्व ठिकाणी आपले मित्र कसे बनले या बाबतही उपस्थितानी आठवणी केल्या .आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात उतार चढाव चालू असतात पण ह्यावेळी पासून आपण सर्वानी आपल्या सोबतच आपल्या मित्रांच्या कुटुंबाना सहकार्याचा हात देण्याचे एकमताने ठरले .