Home latest News शैक्षणिक साहित्यांच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ पालकांच्या खिशाला बसणार झळ

शैक्षणिक साहित्यांच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ पालकांच्या खिशाला बसणार झळ

72

शैक्षणिक साहित्यांच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ

पालकांच्या खिशाला बसणार झळ

शैक्षणिक साहित्यांच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ पालकांच्या खिशाला बसणार झळ

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर :17 जून
नवीन शैक्षणिक वर्षाला लवकरच सुरूवात होणार आहे. शालेय साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, सर्व प्रकारच्या शैक्षणिक साहित्यात सरासरी 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
स्थानिक बाजारपेठेत शालेय साहित्याचे विक्रेते आहेत. गेल्यावर्षी दीडशे रुपये डझन असणार्‍या वह्या आता दोनशे रुपयांवर गेल्या आहेत. तसेच पाच रुपयांना मिळणारा साधा पेन आता सात रुपयांना मिळत आहे. इंधनाचे वाढलेले दर, कागद टंचाई याचा शालेय साहित्य दरवाढीवर परिणाम झाला आहे. पेन्सिलपासून बुकपर्यंत सर्वच साहित्याच्या किंमती वाढल्याने पालकांचे शैक्षणिक बजेट कोलमडले आहे.
तीन रुपयाची साधी पेन्सिल पाच ते सात रुपयांत, तर दहा रुपयांचे पेन 15 रुपयांवर पोहचले आहे. वह्यांच्या किंमती डझनामागे 60 ते 100 रुपयांनी वाढल्या आहेत. नामांकित कंपन्यांच्या वह्यांच्या दरात 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय कंपास आणि कंपास साहित्य 15 टक्क्यांनी, तर विद्यार्थ्यांच्या दप्तरचे भाव 15 टक्क्यांनी वाढले आहेत.
स्कूल बँग व टिफिनचे शेकडो प्रकार दुकानात उपलब्ध असल्याने त्यांची खरेदीही वाढली आहे. महागाईची झळ आता शाळेपर्यंत पोहोचली असली तरीही शैक्षणिक साहित्य गरजेचे असल्याने पालकांना ते खरेदी करावेच लागणार आहे. वह्या, नवनीतसह इतर कंपन्यांचे प्रिंटेड स्टेशनरी यांचे भाव 25 ते 30 टक्क्यांनी महागले आहे. वाहतूक खर्च, पेपरच्या वाढलेल्या किंमतीमुळे शैक्षणिक साहित्य महागले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.