Home latest News रायगड जिल्हयात शेतकरी सन्मान निधीचे सव्वा लाख लाभार्थी, सात हजार जनाचे ई-केवायशीअपूर्ण...

रायगड जिल्हयात शेतकरी सन्मान निधीचे सव्वा लाख लाभार्थी, सात हजार जनाचे ई-केवायशीअपूर्ण योजनेचा 17 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

79

रायगड जिल्हयात शेतकरी सन्मान निधीचे सव्वा लाख लाभार्थी,
सात हजार जनाचे ई-केवायशीअपूर्ण

योजनेचा 17 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

रायगड जिल्हयात शेतकरी सन्मान निधीचे सव्वा लाख लाभार्थी, सात हजार जनाचे ई-केवायशीअपूर्ण योजनेचा 17 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
९४२०३२५९९३

अलिबाग : – तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याशी संबंधित फाइलवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे लवकरच पीएम किसान योजनेतील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. रायगड जिल्ह्यातील पीएम किसान योजनेचे 1 लाख 24 हजार 724 लाभार्थी असून त्यातील 6 हजार 859 शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 362 कोटी इतक्या निधीचे वाटप झाले आहे.
शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकार ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ ही केंद्रीय क्षेत्र योजना राबवत आहे. 24 फेब्रुवारी 2019 रोजी ही योजना अधिकृतपणे सुरू करण्यात आली. सर्व जमीनधारक पात्र शेतकरी कुटुंबांना उत्पन्नाचा आधार देण्याच्या उद्देशाने सरकारने पीएम किसान सन्मान योजना सुरू केली.
पीएम किसान म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. पीएम किसान सन्मान योजनेचे आतापर्यंत 16 हप्ते जमा करण्यात आलेत. 17 वा हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. पण या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी स्तवरावर 2 गोष्टी बंधनकारक आहेत. एक म्हणजे, ज्या खात्यात तुमचे पीएम किसानचे पैसे जमा होतात, ते खाते आधारशी संलग्न करणे बंधनकारक आहे. राज्यातील 2.29 लाख लाभार्थींची बँक खाती आधारशी संलग्न करण्यात आलेली नाहीत.
दुसरी बंधनकारक गोष्ट म्हणजे ई-केवायसी करने. राज्यातल्या एकूण लाभार्थ्यांपैकी 1.98 लाख जणांची ई-केवायसी पेंडिंग आहे.
पीएम किसान या योजनेअंतर्गत फेब्रुवारी 2019 पर्यंत ज्यांच्या नावावर जमीन त्यांनाच लाभ मिळत होता. त्यानंतर ज्यांच्या नावावर जमीन, त्यांना लाभ मिळत नव्हता. कारण, यासाठीच पाच5 वर्षांचा लॉक-इन पीरेड होता. तो आता संपुष्टात आला आहे. पण, या मधल्या काळात काहींनी जमिनींचे वाटप केले, काहींनी जमिनी खरेदी केल्या, त्यामुळे हा पीरेड हटवण्यात यावा, अशी या लोकांची मागणी आहे.
रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 1 लाख 24 हजार 724 लाभार्थी आहेत. त्यातील 1 लाख 17 हजार 665 लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. तर 6 हजार 859 शेतकरी लाभार्थींची ई-केवायसी अपूर्ण आहे. रायगड जिल्हयात आतापर्यंत 362 कोटी 14 लाखांचा निधी किसान सन्मान योजनेअंतर्गत वाटप झाला आहे.

चाैकट-
ई- केवायसी अपूर्ण शेतकरी संख्या
अलिबाग- 657, पेण- 671, मुरुड- 204, खालापूर- 327, पनवेल- 267, कर्जत- 538, उरण- 48, माणगाव- 788, रोहा- 665, तळा- 346, सुधागड- 371, महाड- 672, पोलादपूर- 507, म्हसळा- 404, श्रीवर्धन- 394, एकूण- 6 हजार 859.

चाैकट-
लाभाची रक्कम
अलिबाग- 44 कोटी 21 लाख, पेण- 28 कोटी 78 लाख, मुरुड- 18 कोटी 39 लाख, खालापूर- 20 कोटी 31 लाख, पनवेल- 25 कोटी 42 लाख, कर्जत- 28 कोटी 13 लाख, उरण- 10 कोटी 66 लाख, माणगाव- 43 कोटी 87 लाख, रोहा- 28 कोटी 96 लाख, तळा- 4 कोटी 44 लाख, सुधागड- 14 कोटी 4 लाख, महाड- 42 कोटी 30 लाख, पोलादपूर- 19 कोटी 4 लाख, म्हसळा- 16 कोटी 66 लाख, श्रीवर्धन- 16 कोटी 87 लाख, एकूण- 362 कोटी 14 लाख.

चाैकट-
ई-केवायसीसाठी विशेष मोहीम
प्रधानमंत्री किसान योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा 17 वा हप्ता वितरणापूर्वी स्वत: बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकरी लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता 5 ते 15 जून, 2024 या कालावधीत या विशेष मोहिमेमध्ये करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.