गोवंशीय प्राण्यांची कत्तल व विक्री करणारे तीन आरोपी माणगाव पोलिसांच्या ताब्यात
माणगाव /लोणशी मोहल्ला गावात धक्कादायक प्रकार

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-माणगाव तालुक्यात लोणशी मोहल्ला गावातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार दिनांक १७ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास लोणशी मोहल्ला गावातील इम्तियाज पालेकर यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या गुरांच्या गोठ्यामध्ये १) इम्तियाज गुलाम मोहिद्दीन पालेकर, वय .वर्ष ५५ २)फुरकान सलीम खान ,वय वर्ष २३. ३) सुभान सलीम खानदेशी वय वर्ष २२. हे राहणार सर्व लोणशी मोहल्ला- माणगाव रायगड. या तिघांनी संगमत करून जनावरांच्या गोठ्यामध्ये जनावरांची कत्तल करण्याकरता कोणत्याही शासकीय परवाना नसताना लहान मोठ्या चाकूने व सूरीने एका गोवंशीय प्राण्याची विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर रित्या कत्तल केली.
याबाबत माणगाव पोलिसांना खबर मिळतात घटनास्थळी दाखल झाले सदर घटनास्थळी मिळालेला मुद्देमाल . १) ५०/- रु किंमतीचा एक लाकडी मुठ असलेला ३१ सेमी लांबीचा चाकु श्री जुना वापरता २) १००/- रु किंमतीचा एक निळ्या रंगाची प्लॉस्टिक मुठ असलेला ३३ साो सेमी लांबीचा चाकु जुना वापरता ३) ४०/- रु किंमतीचा एक लाकडी मुठ असलेला ३० मोनं सेमी लांबीचा लोखंडी पात्याचा चाकु जुना वापरता ४) ५०/- रु किंमतीचा एक काळया रंगाची प्लॉस्टिक मुठ असलेला ३१ सेमी लांबीचा लोखंडी पात्याचा चाकु जुना वापरता ५) ५०/- रु किंमतीचा एक चॉकलेटी रंगाची प्लॉस्टिक मुठ असलेला ३१ सेमी लांबीचा लोखंडी पात्याचा चाकु जुना वापरता ६) ५०/- रु किमतीचा एक सफेद रंगाची प्लॉस्टिक मुठ असलेला ३६ सेमी लांबीचा लोखंडी पात्याचा चाकु जुना वापरता ७) १००/- रु किंमतीचा एक लाकडी मुठ असलेला ३७ सेमी लांबीचा लोखंडी पात्याचा सुरा जुना वापरता ८) १००/- रु किंमतीचा एक लाकडी मुठ असलेला ३० सेमी लांबीचा लोखंडी विक्री पात्याचा सुरा जुना वापरता ९) १००/- रु किंमतीचा एक लाकडी मुठ असलेला २७ सेमी उद्देशाने लांबीचा लोखंडी पात्याचा सुरा जुना वापरता १०) २००/- रु किंमतीचा एक लोखंडी मुर्तीचा एकसंघ असलेला ३७ सेमी लांबीचा लोखंडी पात्याचा सुरा जुना वापरता ११) २००/- रु किंमतीचा एक लोखंडी मुठींचा एकसंघ असलेला ३५ सेमी लांबीचा लोखंडी पात्याचा सुरा जुना वापरता १२) २५०/- रु किंमतीचा एक फिक्कट गुलाबी रंगाची मोठी बादली जुनी वापरती १३) २५०/- रु किंमतीचा एक फिक्कट निळ्या रंगाची मोठी बादली जुनी वापरती १४) ६००/- रु किंमतीच्या एशियन पेंट कंपनीच्या दोन बादल्या जुन्या वापरत्या त्यापैकी एका बादलीत पाणी तर दुस-या बादलीत गोवंशीय प्राण्याचे ०२ किलो मांस (बादली व मांसाची एकुण किंमत) १५) ७५०/- रु किंमतीच्या फिक्कट गुलाबी रंगाची दोन घमेली जुनी वापरती त्यापैकी एका घमेल्यात शेण तर दुस-या घमेल्यात गोवंशीय प्राण्याचे ०१ किलो मांस (बादली व मांसाची एकुण किंमत) १६) १०,५००/- रु किमतीचे घटनास्थळी घड, पाय, मुंडके व बारीत कापलेले अशा स्वरुपात मिळून आलेले गोवंशीय जनावरांचे एकुण ७० किलो मांस एकुण किंमत १३,३९०/-
असा एकूण मुद्देमाल मिळाला असून या घटनेची फिर्याद मयूर जनार्दन पाटील पोशि/४८८रा . माणगाव नोकरी माणगाव पोलीस ठाणे यांनी दाखल केली असून कॉ.गु.रजि.नं.१६०/२०२४
भा.द.वि. कलम ४२९,३४ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९६० सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५, ५(ब), ५ (क), ६(१), ९(अ) प्रमाणे तीन जणांना मुद्देमालसह ताब्यात घेऊन तिघांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील,स.पो.नि. भोसले सह पोलिस मगर करीत आहे






