Home latest News रायगडमध्ये अननस, सूर्यफुलाची लागवड यशस्वी अलिबाग, पेणसह मुरुड तालुक्यांमध्ये कृषी विभागाचे 177...

रायगडमध्ये अननस, सूर्यफुलाची लागवड यशस्वी अलिबाग, पेणसह मुरुड तालुक्यांमध्ये कृषी विभागाचे 177 हेक्टरवर विविध प्रकल्प, 560 शेतकऱ्यांचा सहभाग

73

रायगडमध्ये अननस, सूर्यफुलाची लागवड यशस्वी
अलिबाग, पेणसह मुरुड तालुक्यांमध्ये कृषी विभागाचे 177 हेक्टरवर विविध प्रकल्प, 560 शेतकऱ्यांचा सहभाग

रायगडमध्ये अननस, सूर्यफुलाची लागवड यशस्वी अलिबाग, पेणसह मुरुड तालुक्यांमध्ये कृषी विभागाचे 177 हेक्टरवर विविध प्रकल्प, 560 शेतकऱ्यांचा सहभाग

रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
९४२०३२५९९३

अलिबाग -रायगड जिल्ह्याच्या कृषी विभागामार्फत यावर्षी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून हळद लागवड, अननस उत्पादन, शेततळी, सूर्यफूल, भूईमूग, काळीमिरी, करटोलीसह विविध पिकांच्या उत्पादनासाठी प्रकल्प राबविले जाणार आहेत. अलिबाग, पेणसह मुरुड तालुक्यांमध्ये 177 हेक्टरवर हे प्रकल्प राबविण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून 560 शेतकऱ्यांचा यात सहभाग असणार आहे.

रायगडमध्ये अननस, सूर्यफुलाची लागवड यशस्वी अलिबाग, पेणसह मुरुड तालुक्यांमध्ये कृषी विभागाचे 177 हेक्टरवर विविध प्रकल्प, 560 शेतकऱ्यांचा सहभाग

रायगड जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रापैकी 1 लाख 44 हजार हेक्टर क्षेत्र हे विविध हंगामातील पिकाखाली आहे. 1 लाख 4 हजार हेक्टरवर खरिपा, 21 हजार हेक्टरवर रब्बीची लागवड होते. तर सुमारे 22 हजार हेक्टर क्षेत्रावर फळपिकाची लागवड होते. रायगड जिल्ह्यातील शेती क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढते नागरिकरण आणि न परवडणारा शेती व्यवसाय यामुळे शेतकरी शेतीपासून दूर जात आहे. मात्र उपलब्ध शेत जमीनीत नियोजन करून पिके घेतल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. त्यासाठी जिल्हयाचा कृषी विभाग प्रयत्न करीत आहे.
रायगड जिल्ह्याच्या कृषी विभागामार्फत यावर्षी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार असून या उपक्रमांच्या माध्यमातून हळद लागवड, अननस उत्पादन, शेततळी, सूर्यफूल, भूईमूग, करटोलीसह विविध पिकांच्या उत्पादनासाठी प्रकल्प राबविले जाणार आहेत. अलिबाग विभागामार्फत सरी वरंबा पद्धतीने हळद लागवड प्रकल्प 20 हेक्टर राबविला जाणार असून यात 50 शेतकर्यांचा सहभाग असणार आहे, शेततळ्यातील मत्स्योत्पादनासाठी 30 शेतकरी, 10 हेक्टवर अननस उत्पादन प्रकल्पात 50 शेतकऱ्यांसहभाग असणार आहे.
पेण विभागामार्फत जेएसडब्ल्यू यांच्या सहकार्याने 50 शेतकऱ्यासाठी 20 हेक्टरवर करटुली लागवड, 50 शेतकऱ्यासाठी शेततळ्यातील मत्स्योत्पादन, 100 शेतकऱ्यासाठी 50 हेक्टरवर घन जीवामृत निर्मिती व वापर प्रकल्प, 20 हेक्टरवर 50 शेतकऱ्यासाटी सरी वरंबा पद्धतीने भूईमूग लागवड प्रकल्प, 25 हेक्टरवर50 शेतकऱ्यांसाठी सूर्यफूल, 12 हेक्टरवर 30 शेतकऱ्यासाठी भूईमूग लागवड केली जाणार आहे.
मुरुड तालुक्यात 10 हेक्टरवर 50 शेतकऱ्यासाठी अननस लागवड प्रकल्प, 10 हेक्टवर 30 शेतकऱ्यासाठी आंबा, सुपारी, नारळ पिकामध्ये आंतरपिक काळीमिरी उत्पादन प्रकल्प आणि 20 शेतकऱ्यासाठी शेततळ्यामध्ये मत्स्योत्पादन प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत.