“शिक्षण आमचा अधिकार”, “बंद करा त्याचा व्यापार” ‘शासकिय शाळा सुरू राहिल्याच पाहिजेत’… अश्या घोषणा करत निषेध आंदोलन.

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
मुंबई- महाराष्ट्र शासन हजारो शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे, त्यामुळे खेड्यातील,आदिवासी पाड्यातील,झोपडपट्टीतील सर्वसामान्य लाखो विद्यार्थी विद्यार्थीनी शिकू शकणार नाहीत या निर्णयाच्या निषेधार्थ भारतीय लोकसत्ताक संघटना आणि भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ यांच्या वतीने मुंबई सायन कोळीवाडा विभाग येथे चौक सभा रविवार १६ /१०/२०२२ रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत दादासाहेब गायकवाड नगर या ठिकाणी घेण्यात आली.
भारतीय लोकसत्ताक संघटना आणि भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाच्या वतीने शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या
१)शिक्षण हा आमचा अधिकार आहे आणि आम्हला मिळालाच पाहिजे.
२)शासनाने ज्या शाळा बंद करायचे ठरविले आहे त्या शाळा बंध करण्यात येऊ नये.
३)Kg to pg पर्यंतचे शिक्षण हे मोफत ,सक्तीचे आणि एक समान दर्जेदार मिळालेच पाहिजे.
४)शिक्षण देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे .
५)शिक्षणाचा बजेट एकूण बजेटच्या २० टक्के करण्यात यावा.
६)शासनाच्या सर्व शाळांचा दर्जा सुधारून एकसमान व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू राहिल्याच पाहिजे.
तसेच शासनाने मागण्या मान्य नाही केल्या तर मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी निषेध
चौक सभा घेऊ असे संघटनेच्या वतीने वक्तव्य करण्यात आले, त्याचबरोबर आरोग्य, रोजगार व शिक्षण याविषयी लोकांना जनजागृती करण्यात आली.
सदर चौक सभेला स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या मा.वत्सलाताई हिरे अध्यक्ष (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समिती मुंबई २२/३७),अमोलकुमार बोधिराज अध्यक्ष (भारतीय लोकसत्ताक संघटना),दीपिका आग्रे उपाध्यक्ष (भा.लो.सं.),मनिष जाधव अध्यक्ष (भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ),प्रेमसागर बागडे उपाध्यक्ष (भा.लो.वि.सं.),सुप्रिया मोहिते-जाधव उपाध्यक्ष(भा.लो.वि.सं.),अश्विनी पवडमन मुंबई अध्यक्ष(भा.लो.वि.सं.),योगेश कांबळे मुंबई चिटणीस (भा.लो.वि.सं.),किरण गमरे सरचिटणीस(भारतीय लोकसत्ताक बेरोजगार महासंघ)प्रितेश मांजलकर (नाट्ये कलाकार,कवी,दिग्दर्शक, सिद्ध आर्ट्स प्रमुख व भारतीय लोकसत्ताक संघटना सांस्कृतिक प्रमुख) सामाजिक कार्यकर्त्या मा.लताताई चांदमारे,सामाजिक कार्यकर्ते सुरेश बागुल,त्रिग्या प्रितेश मांजलकर (बाळ विद्यार्थी),बुद्धभूषण येलवे,सनी कांबळे,मंगेश खरात,पिलाजी कांबळे, नितीन सातपुते, मयुरेश जंगम,अंकिता मोरे,प्राची शिळकर,कमलेश मोहिते, आनंद नवतुरे,प्रविण हिवाळे,श्रेयस जाधव,गुणवंत कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.








