Home latest News माणगांव तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल शेकाप व ठाकरे शिवसेना च्या बाजूने जाहीर

माणगांव तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल शेकाप व ठाकरे शिवसेना च्या बाजूने जाहीर

94

माणगांव तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल शेकाप व ठाकरे शिवसेना च्या बाजूने जाहीर.

सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-माणगांव तालुक्यातील देगांव, पन्हलघर खुर्द, पन्हलघर बुद्रुक, या तीन ग्रामपंचायतीमध्ये काल 16 ऑक्टोबर 2022 रोजी निवडणुक पार पडली त्याची आज दिनांक 17 ऑक्टोबर 2022 ला निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत जनतेतून थेट सरपंच पदाची निवड असल्यामुळे या निवडणुकीत देगांव ग्रामपंचायत मध्ये शेकाप नी बाजी मारली तर,पन्हलघर खुर्द येथे ठाकरे शिवसेना गट यांनी बाजी मारली तर पन्हलघर बुद्रुक येथे शिंदे गटानी बाजी मारली या ग्रामपंचायत रणधुमाली निवडणुकीत राज्यात बडखोरी आणि सत्ता परिवर्तनंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीत सगळ्या तालुक्याचे लक्ष लागले होते.

देगांव ग्रामपंचायत मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या सुषमा नितीन वाघमारे, या देगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाची निवडणुकीत विजयी झाली आहे. तर पन्हलघर खुर्द येथे हरदास दौलत शेडगे हे ठाकरे शिवसेना सरपंच पदासाठी विजयी झाले आहेत त्याचप्रमाणे पन्हलघर बुद्रुक ग्रामपंचायत येथे शिंदे गट वातेरे संतोष सीताराम हे सरपंच पदानी विजयी झाले आहेत. अशा प्रकारे तीन ग्रामपंचायतीमध्ये शेकाप 1, ठाकरे शिवसेना 1, शिंदे गट शिवसेना 1 अशा पद्धतीने निकाल माणगांव तालुक्यातील तीन ग्रामपंचायत मध्ये लागला आहे.