संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नपुर्तीच्या शिलेदारांची गौरव गाथा . “”मगंलदेशा।पवित्र देशा।महाराष्ट्र देशा।प्रणाम घ्यावा, माझा हा श्री महाराष्ट्र देशा!!

लेख

संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नपुर्तीच्या शिलेदारांची गौरव गाथा .
“”मगंलदेशा।पवित्र देशा।महाराष्ट्र देशा।प्रणाम घ्यावा, माझा हा श्री महाराष्ट्र देशा!!

संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नपुर्तीच्या शिलेदारांची गौरव गाथा . ""मगंलदेशा।पवित्र देशा।महाराष्ट्र देशा।प्रणाम घ्यावा, माझा हा श्री महाराष्ट्र देशा!!

किशोर पितळे: पत्रकार तळा तालुका रायगड.

१ मे हा दिवस प्रत्येक मराठी माणसाच्या दृष्टीने अतिशयअभिमानाचा दिवस आहे.त्या दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्र वासियांना अभिमान असलाच पाहिजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला ६५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने प्रतिवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी निमसरकारी खाजगी पातळीवर साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात.१ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन म्हणून ओळखला जातो.आंतर राष्ट्रीय कामगार दिनाच्याच दिवशी १ मे १९६०साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यासाठी फार मोठा लढा मराठी जनतेला द्यावा लागला.१०६ हुतात्माच्या बलिदानानंतर मुंबई सह संयुक्तमहाराष्ट्र जन्माला आले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा मराठी अस्मितेचा प्रश्न होता हि एकमेव अशी चळवळ आहे तीथे सारे पक्ष एकत्र येऊन मतभेद विसरून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दंड थोपटून एकजूटीने लढले या चळवळीत विचारवंता बरोबर शाहिरी कलावंत सहभागी झाले होते. सर्व सामान्य जनतेला चळवळीत सामावून घेण्यासाठी महत्त्वाचे कार्य पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती केली हे शाहीर नसून तत्कालीन परिस्थितीचे राजकीय सामाजिक, स्थितीचे शिलेदारच म्हणावे लागेल यात मोलाचा वाटा आहे. काँम्रेड श्रीपाद डांगे,आचार्य अत्रे,सेनापती बापट,एस एम् देशमुख, प्रबोधनकार ठाकरे
डाँ.सि.डी देशमुख,दादासाहेब गायकवाड अण्णाभाऊ साठे आत्माराम पाटील,लहू पवार अशा ज्ञात अज्ञान शाहिरांचे या चळवळीत मोलाचा मानदंड होता.
महाराष्ट्रात शाहीरांची पंरपरा शिवकाळापासून चालतआलेली आहे. या शाहिरांनी केलेल्यापराक्रमाचे पोवाडे गावून गावाच्या पारावर इतरांना स्फूर्ती देत.त्यातस्त्रीया देखील खांद्याला खांदा लावून प्रेरणेतून आजच्या संयुक्त महाराष्ट्र निर्मिती झाली आणि तो “सुजलाम सुफलाम”होत असतानाच दिसत आहे.स्वातंत्र्यपुर्व काळात स्वतंत्र चळवळी मध्ये काँग्रेस पक्षाच्या सभां मधून प्रांत रचने संबधी चर्चा होत होती
त्यांनी त्यांच्या सोयी प्रमाणे महत्त्वाची शहरे राज्य टिकवण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थानात प्रांताची आखणी केली होती ती या शिलेदारांना मान्य नव्हती तीअत्यंत गैरसोयीची होती इ.स.१८६२ ते १९३७ कराची,अहमदाबाद, मुंबई व बेळगाव या प्रदेशाचा मिळून मुंबई इलाखा होता १९३७ ते १९५५ कराची वगळून अहमदाबाद, मुंबई, बेळगांंव यांचा मिळून मुंबई हा बहुभाषिक प्रांत होते.स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचना करण्यात आली.१ नोव्हेंबर १९५६ ला गुजरात व महाराष्ट्र मिळून द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण झालेत्यातून मुंबई व बेळगांव वगळण्यात आले.तरविदर्भाचा समावेश नव्हता ते मराठी जनतेला हे द्विभाषीक राज्य मान्य नव्हते.१९४६ पासून एक भाषा संयुक्त महाराष्ट्राची मराठी रहावी अशी मागणी होती.
१९४६ मध्ये प्रसिद्ध साहित्यिक श्री. ग.त्र्यं मांडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली बेळगांव येथे मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणी चा ठराव संमत झाला.आणि महाराष्ट्रातील जनतेने एकभाषी राज्याचे रणशिंग फुंंकले…
मुंबई व महाराष्ट्र यांची फारकत होऊ दिली जाणार नाही म्हणून तत्कालीन केंद्रीयअर्थमंत्रीकै.चिंतामणराव देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती च्या प्रश्नावर लोकसभेत आवाज उठवून एकभाषीमहाराष्ट्रराज्याच्या निर्मितीत दंड थोपटून उभे ठाकलेमुंबईसह महाराष्ट्र  झालाच पाहिजे हि जनतेची मागणी योग्य आहे मुंबई हे हिंदुस्थानचा आत्मा आहे तर महाराष्ट्र शीर आहे तिला तोडण्यासाठी प्रयत्न करू नये यासाठी सि.डी. देशमुख यांनी अर्थमंत्री पदाचा राजिनामादिला.आणीमहाराष्ट्राचे कंठमणी झाले या चळवळीत कुलाबा जिल्ह्याचे शिरोमणी झाले.एक भाषी महाराष्ट्राच्या मागणी चा संदेश जनते पर्यंत पोहोचवण्यासाठी सेनापती बापट बरोबर संत गाडगेबाबा देखील सहभागी झाले होते आचार्य अत्रे यांनी आपल्याप्रभावी वाणीने व लेखणीतून संदेश घरोघरी पोहोचले त्यात १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले.सारीजनता या लठ्यात पेटून उठली.अखेर तत्कालीन पंतप्रधान पंडितजवाहरलाल नेहरु यांना मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करावी लागली.आणि १मे १९६० हा सुमुहूर्त सापडला संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाले.या कामगार दिनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नोकरांचा भारतीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सेवकांचा सन्मान करुन गौरवण्यात येतो.व इतरांना स्फर्ती देतो.
या चळवळीत ज्यांनी ज्यांनी आत्मबलिदान केले रक्ताचे पाट वाहिले,कष्ट उपसले अशा सर्व ज्ञात अज्ञात महनीयांना कोटी कोटी प्रणाम!! 🙏🙏



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *