राजधानी पुन्हा हादरली, दिल्लीत 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार.

54

राजधानी पुन्हा हादरली, दिल्लीत 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार.

नवी दिल्ली :- देशाची राजधानी दिल्लीमध्ये निर्भयावर काही वर्षांपूर्वी झालेल्या बलात्कारानं संपूर्ण देश हादरला होता. या प्रकराच्या घटना करणाऱ्या नराधमांना जरब बसावी म्हणून कडक कायदेही करण्यात आले. मात्र, अजूनही नराधमांची मस्ती कमी झालेली नाही.

दिल्लीमधील ग्रेटर कैलाश भागात 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींमधील एक जण अल्पवयीन आहे.

पीडित मुलगी ग्रेटर कैलाश भागात गेल्या चार महिन्यांपासून कामाला होती. या कामाच्या दरम्यान या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची तिची ओळख झाली. त्या आरोपीनं महिनाभरापूर्वीच काम सोडले होते. त्याने पीडित मुलीला त्याच्या घरी भेटायला बोलावले होते. तिथे अन्य तीन आरोपी देखील उपस्थित होते, या सर्वांनी त्या ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पीडित मुलीने सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन करत सर्व आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर पॉस्को कायद्यासह वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्लीतील शकूर बस्ती रेल्वे स्टेशनवर काही दिवसांपूर्वीच तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती. या बलात्कारातील पीडित तरुणीची तब्येत सध्या गंभीर आहे. संतापजनक बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत.