Home latest News सख्ख्या अल्पवयीन बहिणीला ड्रग्जचे व्यसन लावत वेश्याव्यवसायात ढकलले.

सख्ख्या अल्पवयीन बहिणीला ड्रग्जचे व्यसन लावत वेश्याव्यवसायात ढकलले.

85

सख्ख्या अल्पवयीन बहिणीला ड्रग्जचे व्यसन लावत वेश्याव्यवसायात ढकलले.

भोपाळ:- आपल्या सख्ख्या धाकट्या बहिणीला अंमली पदार्थांचं व्यसन लावून तिला शरीरविक्रयाच्या जाळ्यात ढकलणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. हे सगळं तिने ऐशोआरामात जीवन जगण्यासाठी केल्याची माहिती मिळत आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आरोपी तरुणी 20 वर्षांची आहे. तिची 15 वर्षांची अल्पवयीन बहीण पोलिसांना नशेत गुंग असलेली सापडली. तिला सुधारगृहात नेण्यात आलं. तिथे समुपदेशन करताना तिने धक्कादायक माहिती सांगितली.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मोठ्या बहिणीनेच तिला गांजा, दारू आणि सिगरेटचं व्यसन लावलं. दोन वर्षांपूर्वी तिची बहिण तिला घरच्या गच्चीवर घेऊन गेली. तिथे बहिणीने तिला प्रथमच सिगरेट प्यायला लावली. त्यानंतर रोजच बहीण तिला गच्चीवर नेऊन सिगरेट पाजत असे. त्यानंतर तिने पीडितेला हळूहळू गांजा, दारू यांचं व्यसन लावायला सुरुवात केली.

कालांतराने पीडितेला अंमली पदार्थांचं व्यसन लागलं. त्यामुळे ती बहिणीकडे पैसे मागू लागली. त्यावर, तिच्या मोठ्या बहिणीने पीडितेला शरीरविक्रय करून पैसे कमावण्याबद्दल सांगितलं. तू पैसे स्वतःच कमवून आणलेस तर तुला ब्रँडेड कपडे आणि ड्रग्ज सगळंच मिळू शकेल, असं आमिषही तिने पीडितेला दाखवलं आणि तिला एका माणसाकडे पाठवलं. त्या माणसाचं नाव समीर उर्फ सुनील असं होतं. त्याने पीडितेवर बलात्कार केला आणि तिला 2 हजार रुपये दिले. त्यानंतर बहिणीने पीडितेला दुसऱ्या आरोपीकडे पाठवलं. तिथे गौरव त्यागी उर्फ गोल्डी याने तिच्यावर बलात्कार केला.

हा प्रकार एका लॉजमध्ये घडला. या लॉजवर तिच्यावर गौरवसह लॉजमालक आणि त्याच्या दोन मुलांनीही बलात्कार केला. जेव्हा जेव्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आला, तेव्हा तिला या सर्वांनी पैसे दिले. ते पैसे तिच्या मोठ्या बहिणीने काढून घेतले. या अल्पवयीन मुलीचा जबाब ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. त्यांनी तिच्या मोठ्या बहिणीला अटक केली. चैनीचं आयुष्य जगण्यासाठी या तरुणीनेच जाणूनबुजून आपल्या अल्पवयीन बहिणीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचं तिने कबूल केलं आहे.