Home latest News शरीरसंबंध न ठेवल्यास नापास करेन; शिक्षकाची अल्पवयीन मुलींना धमकी

शरीरसंबंध न ठेवल्यास नापास करेन; शिक्षकाची अल्पवयीन मुलींना धमकी

79

शरीरसंबंध न ठेवल्यास नापास करेन; शिक्षकाची अल्पवयीन मुलींना धमकी

जयपूर:- परीक्षेत चांगले गुण देण्याच्या बदल्यात शरीरसंबंधांची मागणी करणाऱ्या शिक्षकाला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. शाळेतील मुलींनी शिक्षकाची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

ब्लॉक शिक्षण अधिकारी शाळेला भेट देण्यासाठी आले असताना संपूर्ण प्रकार उघडकीस आला. शाळेतील विद्यार्थिंनीनी घडत असलेला धक्कादायक प्रकार ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितला. शरीरसंबंध ठेवा अन्यथा परिणामांना सामोरे जा, अशा प्रकारची धमकी शिक्षक देत असल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलं. शरीरसंबंध न ठेवल्यास परीक्षेत नापास करेन, अशीही धमकी शिक्षकानं दिली होती.

विद्यार्थीनींनी केलेल्या आरोपांची ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. शिक्षण विभागनं याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीला तातडीनं ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात आयपीएस आणि पोस्कोच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही अल्पवयीन विद्यार्थिनी मागासवर्गीय जाती/जमातीच्या असल्यानं आरोपी शिक्षकाविरोधात ऍट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गतही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्याला पोस्को न्यायालयानं २ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.