Home latest News २८ मागण्यांसाठी दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप

२८ मागण्यांसाठी दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप

72

२८ मागण्यांसाठी दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप

२८ मागण्यांसाठी दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप

✍कृनाल येलगुंडे,✍
हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज.
96579 44844

हिंगणघाट : – २८ मागण्यांसाठी दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप हिंगणघाट तालुक्यात मध्यवर्ती संघटनेतर्फे
एनपीएस. हटाव तसेच २८ मागण्यांसाठी गेल्या दोन वर्षापासून सरकारी निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हिंगणघाट येथील तहसील कार्यालयाच्या प्रागणात मध्यवर्ती संघटणेतर्फे नॅशनल पेंशन स्कीम तसेच विविध मागण्यांना घेऊन दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकाण्यात आलेले आहे. एन.पी.एस. हटाव व जुनी पेंशन लागू करावी तसेच खाजगीकरण, नोकर कपात, कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार, कंत्राटीकरण या बाबींविरोधात व अंशकालीन व कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करणे, रिक्त पदे भरणे, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बिनशर्त करणे, बक्षी समितीचा अहवाल खंड-2 प्रसिध्द करणे, सर्व भत्ते केंद्राप्रमाणे देणे, निवृत्तीचे वय साठ वर्षे करणे, नविन शिक्षण धोरण रद्य करणे, उत्कृष्ठ कामाकरीता आगाऊ वेतनवाढ देणे. वैद्यकिय शिक्षण व संशोधन विभागातील सर्व वैद्यकिय महाविद्यालयीन रुग्णसेवेशी संबंधित नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करणे, शिक्षकांना केंद्राच्या धर्तीवर दहा , वीस , तीस , वर्षाची पद्योन्नती लागू करणे, या व इतर एकूण २८ मागण्यांसाठी आज २३ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२२ रोजी, हिंगणघाट तालुक्यातील सर्व शासकिय कार्यालयातील कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दोन दिवसांच्या लाक्षणिक संप पुकारून सहभागी होत आहे. या संदर्भात हिंगणघाट येथील तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर संप यशस्वी करणेकरीता सर्व विभागाचे कर्मचारी तसेच तहसिल व उपविभागिय अधिकारी हिंगणघाट कार्यालयातील नरेश येतेकर, विपीन मस्के, हर्षकुमार डबले, राजू धात्रक, संतोष चव्हाण, प्रविण झोड, दिनेश मंडलवार, मदन माडे, प्रमोद पांडे, संजय उईके, जोगेन्द्र जगनाडे, लक्षमण वेले, पंकज वाघमोडे, अनिल गायकवाड, प्रताप मोरे, विनीता राठोड, पूनम धात्रक, तेजस्विनी चरडे, संध्या ढवळे, अनिल गायकवाड ,धनराज झाडे तसेच आदी कर्मचारी व शिक्षकवर्ग या संपात सहभागी होते.