Home latest News पाणी हेच जिवन असून पाण्याचा काटकसरीने वापर करा : आ. कृष्णा गजबे...

पाणी हेच जिवन असून पाण्याचा काटकसरीने वापर करा : आ. कृष्णा गजबे यांचे आवाहन

77

पाणी हेच जिवन असून पाण्याचा काटकसरीने वापर करा : आ. कृष्णा गजबे यांचे आवाहन

पाणी हेच जिवन असून पाण्याचा काटकसरीने वापर करा : आ. कृष्णा गजबे यांचे आवाहन

*नंदलाल एस. कन्नाके*
*जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी*
*गडचिरोली*
*मिडिया वार्ता न्युज गडचिरोली*
*मो.नं. 7743989806*

*आरमोरी* : वैरागड येथील वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणे हे माझे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण होत असतांना वैरागड वाशीयांना पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र प्रत्येकाने या पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. ते २२ रोजी वैरागड येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे उदघाटन करतांना बोलत होते.
वैरागड येथील पिण्याच्या पाण्याची समस्या जाणून केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०२१-२०२२ या वर्षात नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. याचा लाभ वैरागड व पाठणवाडा या दोन गावांना होणार असून दरवर्षी उद्भवणारी पाण्याची समस्या कायम स्वरुपी सुटणार आहे.
नुकतेच २२ रोजी या वाढीव नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन कार्यक्रम आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य संपत आळे हे होते. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती निताताई ढोरे, उपसभापती व्ही. डी. बावनकर, जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, जिल्हा परिषद गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता अमित तुरकर, पोलीस निरीक्षक काळबांडे, विभागीय पाणी पुरवठा अभियंता पांडे, अभियंता शरद देवीकर, कंत्राटदार प्रतिनिधी अभिलाष चुटे, सरपंच संगिता पेंदाम, उपसरपंच भाष्कर बोडणे, माजी जिल्हा परिषद सदस्य केशव गेडाम, तं. मु. स. अध्यक्ष महादेव गेडाम, मुखरु खोब्रागडे, बालाजी पोफळी, दत्तू सोमनकर उपस्थित होते.