Home latest News गडचिरोली ईमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळातील कर्मचाऱ्यांची हुकुमशाही कारभार.

गडचिरोली ईमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळातील कर्मचाऱ्यांची हुकुमशाही कारभार.

68

गडचिरोली ईमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळातील कर्मचाऱ्यांची हुकुमशाही कारभार.

गडचिरोली ईमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळातील कर्मचाऱ्यांची हुकुमशाही कारभार.

✍विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱

गडचिरोली, महाराष्ट्र शासनाकडून नेहमीच कामगाराच्या हितासाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात. महाराष्ट्रातील अनेक प्रकारच्या कामगारांसाठी महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली. त्याच बरोबर प्रत्येक जिल्ह्यात या मंडळाचे कार्यालय निर्माण करण्यात आले. तसेच गडचिरोली येथे एक कार्यालयाचे निर्माण करण्यात आले. या कार्यालयामार्फत विविध 25 कल्याणकारी योजना राबविल्या जातात त्यात शैक्षिणक, आरोग्य, आर्थिक, सामाजिक, सुरक्षा अश्या प्रकारचे अनेक योजना राबविल्या जातात. पण गडचिरोली कामगार कार्यालयातील काम करणारे काही कर्मचारी स्वतः च्या घरी कीव्हा घराशेजारील भाड्याची रूम करून एखाद्या व्यक्तीला अर्ज ऑनलाईन करण्याचे काम देतात व तेच अर्ज स्वीकार करण्यात येतो व बाकीच्या कामगाराचे अर्ज ते लोकं नाकारतात व या कार्यालयातील काही कर्मचारी आपले एजेंट ठेऊन कामगार नागरिकांकडून अर्ज ऑनलाईन करण्याचे एक हजार ते दोन हजाराहून जास्त पैश्याची मागणी करतात जे कामगार पैशे देत नाही त्यांचे अर्ज इथले कर्मचारी ऑनलाईन करत नाही. हा असा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात गडचिरोली कामगार कार्यालयात सुरू आहे. एवढेच नाही तर. पैसे दिलेल्या कामगार नागरिकांचे अर्ज एका अज्ञात व्यक्तीच्या घरी नेऊन ऑनलाईन चे काम करतात. तो अज्ञात व्यक्ती गडचिरोली कामगार कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील कामगाराचे एक हजार पेक्षा जास्त अर्ज व श्री साई कंत्राटदराचा बनावट शिक्का व काही अर्जावर तर फक्त फोटो लाऊन पूर्णपणे न भरलेले अर्ज अज्ञात व्यक्ती च्या रूमवर सापडले. या मुळे गरीब कामगार नागरिकांची पूर्णपणे फसवणूक होत आहे. कामगार कार्यालयातील काही कर्मचारी या प्रकरणात समावेश आहे.
यामुळे जे खरे कामगार आहे. ते या अनेक योजना पासून वंचित राहतात. व जे खोटे कामगार आहेत ते पुढे येऊन कामगार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना एक हजार, दोन हजार रुपये देऊन या योजनेचा लाभ उचलतात ही अतिशय खेदजनक बाब आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ईमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळातील कर्मचाऱ्यांची दादागिरी व हुकुम शाही कारभार चालली आहे. तरी या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची व कामाची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर ताबडतोब निलंबनाची कारवाई करावी अशी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व गरीब कामगार नागरिकांकडून होत आहे.