Home latest News चांदली येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन जि.प. सदस्य क्रिष्णा सहारे, पं.स. सदस्य...

चांदली येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन जि.प. सदस्य क्रिष्णा सहारे, पं.स. सदस्य विलास उरकुडे यांची प्रमुख उपस्थिती

83

चांदली येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

जि.प. सदस्य क्रिष्णा सहारे, पं.स. सदस्य विलास उरकुडे यांची प्रमुख उपस्थिती

चांदली येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन जि.प. सदस्य क्रिष्णा सहारे, पं.स. सदस्य विलास उरकुडे यांची प्रमुख उपस्थिती

क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी तालुक्यातील चांदली येथील जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत अर्धवट स्थितीत होती. सदरची बाब गांभीर्याने घेत चांदली ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच तथा विद्यमान उपसरपंच संदीप बगमारे यांनी सदर कामाची मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य क्रिष्णा सहारे यांच्या कडे केली होती. तेव्हा जि.प. सदस्य क्रिष्णा सहारे यांनी संरक्षणभींतीचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा विकास निधीतून निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले. व ब्रम्हपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य विलास उरकुडे यांच्या पं.स. स्तरावरील १५ व्या वित्त आयोगातुन गावात बंदीस्त नाली बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला.
सदर कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य क्रिष्णा सहारे व पं.स. सदस्य विलास उरकुडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी चांदली येथील सरपंच योगीता बनकर, चांदली येथील उपसरपंच संदीप बगमारे, ग्रा.पं.सदस्य स्वप्नील गायकवाड, ग्रा.पं. सदस्या ममताताई बनकर, ग्रा.पं. सदस्या चेतनाताई गणवीर, ग्रा.पं. सदस्य महेश ढोरे, ग्रा.पं. सदस्या गीताताई पिलारे, तंमुस अध्यक्ष सरोज बगमारे, तंमुस उपाध्यक्ष गुलाब करंबे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेवनाथ पिलारे, जि.प‌ शाळेचे मुख्याध्यापक बोदेले सर, तरोणे मॅडम, यशवंत ढोरे, ईश्वर ढोरे, आशिष करंबे यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.