Home latest News जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्याचा राज्यव्यापी संप.

जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्याचा राज्यव्यापी संप.

65

जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्याचा राज्यव्यापी संप.

जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्याचा राज्यव्यापी संप.

 

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड-महाराष्ट्र राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी ग्रामीण विकास विभागातील सर्व तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप २३ व २४ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती कार्यालय येथे आयोजन करून संपात सहभागी झाले.
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी चे धोरण हे कर्मचाऱ्याच्या भविष्यासाठी मारक असल्याने ग्रामीण विकास विभागातील येणाऱ्या सर्व तृतीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे त्यामुळे अनेक कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे तर ग्रामसेवक संघटनेचे पंचायत समिती कार्यालय येथे ठिय्या आंदोलन सुरू केले.शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षकांनी काळ या फिती लाऊन काम केल्याचे चित्र दिसून आले असून तालुक्यात राज्यव्यापी लाक्षणिक संपामुळे अनेक कार्यालये ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसला आहे.यातच बँक कार्यालयात लिंक नसल्याने अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे.कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात लाक्षणिक संप पुकारून निषेध व्यक्त केला .