Home latest News माता महाकाली मंदिराच्या परिसरात जनसुविधेची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करा – आ....

माता महाकाली मंदिराच्या परिसरात जनसुविधेची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करा – आ. किशोर जोरगेवार

75

माता महाकाली मंदिराच्या परिसरात जनसुविधेची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करा – आ. किशोर जोरगेवार

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:8830857351

चंद्रपूर, २२ डिसेंबर: चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिर परिसरात जनसुविधेची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. झाडीपट्टी नाट्यगृहासाठी निधी देण्याची मागणीही यावेळी आ. जोरगेवार यांनी केली आहे.        

अधिवेशानाच्या तिस-या दिवशी नगर विकास विभागाच्या भाग क्रमांक १०९ पुर्व सुविधा अंतर्गत विषयावर बोलतांना आ. जोरगेवार यांनी माता महाकाली मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. यावेळी सभागृहात बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर हे माता महाकालीचे शहर म्हणून ओळखले जाते, विद्यमान मुख्यमंत्री तत्कालीन नगर विकास मंत्री असतांना आणि आताचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री असतांना त्यांनी माता महाकाली मंदिराच्या विकासासाठी ५९ कोटी रुपये मंदिराच्या बांधकामाला दिले. या कामाच्या निविदेला मंजुरीही देण्यात आली आहे. मात्र आता टप्पा २ च्या कामासाठी ७५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. येथील झरपट नदीच्या ठिकाणी असलेल्या घाटांची, मंदिर प्रवेशद्वार यासह मंदिर परिसरात जनसुविधेची कामे करण्यासाठी या निधीची आवश्यकता असुन हा निधी अर्थमंत्री यांनी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी यावेळी बोलतांना आ. जोरगेवार यांनी केली आहे.

चंद्रपूर, गडचिरोली, भंडार आणि गोंदीया या चार जिल्हांमध्ये झाडीपट्टी रंगभूमी आहे. जवळपाच ५० ते ६० हजार कलावंत येथे आहे. मनोरंजनासह सामाजिक प्रबोधनाचे काम या झाडीपट्टी कलावंताच्या वतीने केल्या जात आहे. ग्रामीण भागामध्ये काही काळापुरते त्यांच्या नाटकाचे प्रयोग होतात. इतर वर्षभर मात्र त्यांना आपले नाटक सादर करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. चंद्रपूरात असलेल्या नाट्यगृहाचे भाडे या कलावतांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे या झाडीपट्टी कलावंतांना अद्यावत नाट्यगृह नगर विकास माध्यमातुन तयार करण्यात यावे अशी मागणी यावेळी बोलतांना आ. जोरगेवार यांनी केली आहे.