Home latest News डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर “यशस्वी परिक्षार्थांचा प्रमाणपत्र...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर “यशस्वी परिक्षार्थांचा प्रमाणपत्र आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न”

81

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर “यशस्वी परिक्षार्थांचा प्रमाणपत्र आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न”

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर "यशस्वी परिक्षार्थांचा प्रमाणपत्र आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न"

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०

मुंबई – बुद्ध धम्म प्रचार समिती (रजि.)
ट्रेर्निंग इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स डेव्हलपमेंट ( TRAINING INSTITUTE OF SKILLS DEVELOPMENT )भांडुप केंद्र आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित यशस्वी परिक्षार्थींचा प्रमाणपत्र आणि पारितोषिक वितरण सोहळा रविवार दि. २३ ऑक्टोबर २०२२सकाळी ११.०० वा. भांडुप येथे
मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली. आयु. सुरेश घोडगे यांनी धम्मज्ञान परिक्षेवर सुंदर अशी कविता सादर केली. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व परीक्षार्थींना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या परिक्षार्थींना पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

तदनंतर यशस्वी परीक्षार्थींनी आपला अनुभव सांगत, आयोजकांचे आभार व्यक्त केले आणि पुढच्या वर्षी त्यांच्या विभागात ही परीक्षा आयोजित करण्याचा मानस दाखवला. कार्यक्रमाच्या शेवटी भांडुप केंद्र प्रमुख आयु. संतोष खोडके यांनी धम्मज्ञान परीक्षा उपक्रम राबविण्याचा हेतू, उद्देश बाबत भूमिका मांडली. आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे महत्व पटवून दिले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी TISD च्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काम करण्याऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

तसेच पारितोषिक मिळवलेल्या परिक्षार्थींची नाव

ज्युनिअर ग्रुप
प्रथम क्रमांक : उमेश कोकण
प्रथम क्रमांक : लावण्या जामदा
द्वितीय क्रमांक : रेयांषा काळ

तृतीय क्रमांक : करुणा वाघ
तृतीय क्रमांक : यश धनराज

सिनिअर ग्रुप :
प्रथम क्रमांक : प्रथमेश पाके
द्वितीय क्रमांक : प्रा.ज्योती धुतमल पंडित

तृतीय क्रमांक : प्रदीप भिसे
तृतीय क्रमांक : संगीता कळसरे