Home latest News शाळा हे देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याऱ्या विद्यार्थ्यांचे” महाराष्ट्र शासनाने हजारो शाळा बंद...

शाळा हे देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याऱ्या विद्यार्थ्यांचे” महाराष्ट्र शासनाने हजारो शाळा बंद करण्याऱ्या निर्णयाचे निषेधार्थ ‘चौक सभा’ व ‘जनजागृती’ आंदोलन…

74

शाळा हे देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याऱ्या विद्यार्थ्यांचे” महाराष्ट्र शासनाने हजारो शाळा बंद करण्याऱ्या निर्णयाचे निषेधार्थ ‘चौक सभा’ व ‘जनजागृती’ आंदोलन…

शाळा हे देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याऱ्या विद्यार्थ्यांचे" महाराष्ट्र शासनाने हजारो शाळा बंद करण्याऱ्या निर्णयाचे निषेधार्थ 'चौक सभा' व 'जनजागृती' आंदोलन...

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०

विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क व अधिकारासाठी लढणारी ‘भारतीय लोकसत्ताक संघटना’ आणि ‘भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ’

मुंबई-महाराष्ट्र सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या असणाऱ्या शासकीय शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल १७००० शाळा बांस होऊ शकतात,ज्यामुळे ३,४०,००० विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा तसेच शिक्षकांच्या रोजगाराचा प्रश्न उदभवणार आहे.नागरिकांच्या करातून सुरू असलेल्या शासकीय शाळा ज्यात हजारो गरीब,वंचित समुदायातील, गावं खेड्यातील, आदिवासी पाड्यातील असंख्य विद्यार्थी शिकतात त्या शासकीय शाळा महाराष्ट्र सरकार बंद करत आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ भारतीय लोकसत्ताक संघटना आणि भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ यांच्या वतीने बांद्रा स्टेशन (प) मुंबई -५० या ठिकाणी चौक सभा शनिवार २२/१०/२०२२ रोजी सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत घेण्यात आली.

भारतीय लोकसत्ताक संघटना आणि भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाच्या वतीने शासनाने या मागण्या मान्य कराव्या
………………………….……………………

१)शिक्षण हा आमचा अधिकार आहे आणि आम्हला मिळालाच पाहिजे.

२)शासनाने ज्या शाळा बंद करायचे ठरविले आहे त्या शाळा बंध करण्यात येऊ नये.

३)Kg to pg पर्यंतचे शिक्षण हे मोफत ,सक्तीचे आणि एक समान दर्जेदार मिळालेच पाहिजे.

४)शिक्षण देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे .

५)शिक्षणाचा बजेट एकूण बजेटच्या २० टक्के करण्यात यावा.

६)शासनाच्या सर्व शाळांचा दर्जा सुधारून एकसमान व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू राहिल्याच पाहिजे.
……….………………………………………

शासनाने आमच्या या मागण्या मान्य न केल्या नाही तर मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी निषेध
चौक सभा घेऊ असे संघटनेच्या वतीने वक्तव्य करण्यात आले, त्याचबरोबर आरोग्य, रोजगार व शिक्षण याविषयी लोकांना जनजागृती करण्यात आली.

सदर चौक सभेला स्थानिक सामाजिक कार्यकर्ते , अमोलकुमार बोधिराज – अध्यक्ष (भारतीय लोकसत्ताक संघटना), दीपिका आग्रे – उपाध्यक्ष (भा.लो.सं.), विशाल गायकवाड – अध्यक्ष (भारतीय लोकसत्ताक बेरोजगार महासंघ), मनिष जाधव – अध्यक्ष (भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ), किरण गमरे – सरचिटणीस (भारतीय लोकसत्ताक बेरोजगार महासंघ), सुप्रिया मोहिते – उपाध्यक्ष (भा.लो.वि.सं.), प्रेमसागर बागडे – उपाध्यक्ष (भा.लो.वि.सं.), अश्विनी पवडमन – मुंबई अध्यक्ष (भा.लो.वि.सं.), योगेश कांबळे – मुंबई सचिव (भा.लो.वि.सं.), संदिप आंग्रे, मंगेश खरात, नितीन सातपुते, कमलेश मोहिते, अभिषेक कासे, अतुल मोहिते – सचिव ( भा. लो. वि स ), अक्षय जाधव – अध्यक्ष ( भा. लो. सं केंद्र क्र – १०५ ) तसेच सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक आयु. विशाल कदम – कोषध्यक्ष ( बौ. पं. स शाखा क्र – ५७० ), रवींद्र कदम – ( संघरत्न सामाजिक संस्था – कोषध्यक्ष ), आणि योगेश ओवळे, संतोष हाडिक, सागर गायकवाड तसेच नितेश मोरे आणि ताहीर शेख – ( मुस्लिम कार्यकर्ता ) आणि भा. लो. सं केंद्र क्र- १०५ चे सगळे कार्यकर्ते सभासद आणि बांद्रा मधील प्रत्येक जातीची लहान मुलं इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.