Home latest News पेन्शनमध्ये वाढ करण्याची सेवानिवृत्त कर्मचारी यांची मागणी..

पेन्शनमध्ये वाढ करण्याची सेवानिवृत्त कर्मचारी यांची मागणी..

44

समाधानकारक जीवन जगता यावे यासाठी (eps-95) पेन्शनमध्ये वाढ करण्याची सेवानिवृत्त कर्मचारी यांची मागणी

कळंब: राज्य परिवहन महामंडळ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या अल्प पेन्शन मध्ये वाढ करण्यात यावी या व इतर मागण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गणेश शिंदे, उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत दि. 24 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले, या निवेदनात eps 95 सेवानिवृत्त वृद्ध कर्मचाऱ्यांना आपले राहिलेले जीवन सुखा समाधानाने जगता यावे यासाठी सरकारने 1000 रुपये अल्प पेन्शन मिळते तिच्यामध्ये वाढ करून 7500 रुपये करण्यात यावी , त्यांना व त्यांच्या जीवन साथीदारास मोफत आरोग्य सुविधा देण्यात यावी ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना eps-95 योजनेमध्ये समाविष्ट केले नाही अशा कर्मचाऱ्यांना 5000 हजार रुपये मासिक पेन्शन मिळावी आदी मागण्यासाठी गेली दहा वर्ष राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एस.एन. आंबेकर यांच्या नेतृत्वात आंदोलने करीत आहेत,

आंदोलन सुरू असताना प्रतिदिवशी 200 ते 250 पेन्शर्स मृत्युमुखी पडत आहेत या सर्व बाबींचा विचार होऊन केंद्र सरकारने या कुटुंबाचे शुभचिंतक व संरक्षक म्हणून आगामी कॅबिनेट मीटिंगमध्ये मागण्या मान्य कराव्यात नसता संघटनेच्या वतीने देशव्यापी उपोषण आंदोलन , व 5 डिसेंबर रोजी अधिक तीव्र आंदोलन करण्यासाठी मजबूर करू नका असा इशारा या निवेदनात देण्यात आला असून संघटनेचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा महाराष्ट्र येथे दिनांक 24 डिसेंबर 2018 पासून साखळी उपोषण सुरू आहे या आंदोलनाची सन्मानपूर्वक समाप्ती करावी अशी विनंती करण्यात आली असून या निवेदनावर संयोजक अच्युतराव माने पाटील, राजाभाऊ आंधळे, धाराशिव एम ,स्वामी लोहारा, नबी शेख धाराशिव, रामभाऊ कवडे, यु.बी. शिंगणापूरे, बशीर पठाण, गुलाब बागवान,, पाठिंबा म्हणून ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ ,माधव सिंग राजपूत, सचिन क्षिरसागर यांच्या सह्या आहेत.