परभणी तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
सदाशिव राऊत
परभणी: आई नसलेल्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास पोक्यसो कायद्यानुसार वीस वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाचे शिक्षा विशेष तदर्थ जिल्हा न्यायाधीश जी जी भरणे यांनी सोमवारी दिनांक 24 सुनावली या प्रकरणात अन्य एकास मुख्य आरोपी सहाय्य केल्याप्रकरणी वीस वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा देखील सुनावण्यात आली.
आई नसलेली मुलगी आजी जवळ राहत असताना एप्रिल 2024 पासून जिंतूर येथील शैलेश हरिभाऊ घोगरे यांनी तिच्या घरी जाऊन जवळीकता निर्माण केली. त्यातूनच भेटवस्तू व आमिषे दाखवत गावातील गजानन घोगरे त्याच्या घरी तिला घेऊन जात त्या घरी कोणी नसताना तिथे मनाविरुद्ध त्याने शारीरिक संबंध ठेवले. त्यातूनच ती गर्भवती राहिली याबाबत पीडितेच्याआजीने जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलिसांना दिलेल्या जबाबात शैलेश घोगरे याने सहकार्य केल्याचे म्हटल्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता
तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, बि बी पुंड, यांनी तपास करून दोघाविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले. याप्रकरणी साक्षी पुरावा चालू असताना मुख्य आरोपी शैलेश घोगरे यास जेलमध्ये ठेवूनच प्रकरण चालवण्यात आले सरकार पक्षातर्फे अँड बाबासाहेब घंटे यांनी बाजु मांडताना सहा साक्षीदार तपासले मुलगी अल्पवयीन असल्याचे सिद्ध केले. त्यातून आरोपी शैलेश घोगरे यांनी सतत लैंगिक अत्याचार केल्याचे संशयापलीकडे सिद्ध करताना गजानन घोगरे यांनी या प्रकरणात त्याला मदत केल्याचे सिद्ध केल्यावरून न्यायाधीश भरणे यांनी या दोघांनाही पोक्यसो कायद्यानुसार कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा सहकारी वकील अँड ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अँड बी बी घटे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून फौजदार सुरेश चव्हाण, अमलदार प्रमोद सूर्यवंशी, आकाश रेड्डी, वंदना अदोडे, यांनी काम पाहिले.








